Mumbai Indians | रोहित आणि झहीर खानमधील अंतर्गत भेदभाव चव्हाट्यावर; मुंबई इंडिअन्सला बसतोय फटका?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Indians | आयपीएलच्या (IPL) थराराला सुरूवात झाली आहे मात्र गतविजेत्या मुंबई इंडिअन्स (Mumbai Indians) संघाला आपला पहिला विजयही मिळवता आला नाही. संघाच्या सुमार कामगिरीमुळे चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. मात्र अशातच मोठी आणि धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि संचालक झहीर खान (Zaheer Khan) यांच्यामधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत.
मुंबईच्या संघाचा खंदा फलंदाज सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या निवडीवरून दोघांमधील मतभेत असल्याचं दिसत आहे. 2 एप्रिलला मुंबई आणि राजस्थान रॉयल्स संघामध्ये (Mumbai Indians vs Rajasthan Royals) सामना होता त्यावेळी सामना होण्याअगोदर झहीर खानची एक पत्रकार परिषद पार पडली होती. त्यामध्ये, सुर्यकुमार यादव हे रिटेन केलेला खेळाडू असून त्याने लवकरात लवकर मैदानात उतरावं यासाठी आम्ही उत्सुक आहोत. राजस्थानविरूद्धच्या सामन्यात तो उपलब्ध असेल, असं झहीर खानने सांगितलं होतं. त्यानंकर सुर्यकुमार हा सराव करतानाही दिसला. मात्र त्यादिवशीच्या सामन्यात अंतिम 11 मध्ये दिसला नाही.
मुंबई इंडिअन्स आणि राजस्थानमधील सामना पार झाल्यावर सुर्यकुमारबाबत रोहितला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी, सुर्यकुमार यादव हा आमच्या संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. सुर्या जेव्हा फिट होईल तेव्हा त्याला संघात जागा मिळेल. सुर्याच्या बोटाला गंभीर दुखापत असून ती लवकरच बरी होण्याच्या मार्गावर असल्याचं रोहित म्हणाला होता. (Mumbai Indians)
दरम्यान, रोहित शर्मा आणि झहीर खान यांच्या मतांमध्ये वेगळंपण दिसून आलं.
त्यामुळे आता सुर्यकुमारच्या फिटनेसबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
त्यामुळे आता कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) तिसऱ्या सामन्यात तरी सुर्या दिसतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Web Title :- Mumbai Indians | differences between rohit sharma and zaheer khan see what happened to mumbai indians after the defeat tata ipl 2022
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update