‘सरस’ रनरेटच्या जोरावर मुंबई इंडियन्सची ‘गरुडझेप’ !

पोलिसनामा ऑनलाईन – आयपीएल सामन्यांमध्ये आता रंग चढू लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध सामन्यात सुपरओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर गतविजेत्या मुंबई इंडियन्सने धडाकेबाज पुनरागमन केले आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबवर 48 धावांनी मात करत मुंबईने हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे. विजयाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अव्वलस्थानावर झेप घेतली आहे.

पंजाबचा संघ 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 143 धावांपर्यंत मजल मारु शकला. या विजयाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अव्वलस्थानावर झेप घेतली आहे. चार सामन्यांत मुंबईने गमावलेले दोन्ही सामने हे फार कमी फरकाने होते, त्यामुळे मुंबईच्या धावगतीवर याचा फारसा परिणाम झालेला नाही. त्यातच पंजाबवर 48 धावांनी मात केल्यामुळे मुंबईचा रनरेट +1.094 इतका झाला असून त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थान मिळाले आहे. पंजाबच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच अंकुश ठेवण्याचे काम मुंबईच्या गोलंदाजांनी केले. मोठे फटके खेळण्याची संधी न देता फलंदाजांवर दडपण आणण्यात मुंबईचे गोलंदाज यशस्वी ठरले. मुंबईकडून जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी 2-2 तर ट्रेंट बोल्ट आणि कृणाल पांड्या यांनी 1-1 बळी घेतला.