मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Indians Ishan Kishan In IPL 2022 | भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माविषयी (Rohit Sharma) युवा स्टार खेळाडूने धक्कादायक खुलासा केला आहे. रोहित शर्मा हा चालू सामन्यात शिव्या देत असल्याचं मुंबई इंडिअन्सचा खेळाडू इशान किशनने (Ishan Kishan) म्हटलं आहे. ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन (Breakfast with Champion) शोमध्ये इशानने रोहित आणि विराट कोहलीबाबत भाष्य केलं आहे. (Mumbai Indians Ishan Kishan In IPL 2022)
रोहित शर्मा चालू सामन्यात शिव्या देतो आणि त्यानंतर त्या खेळाडूकडे जाऊन मनाला नको लावूस, असं सांगतो. त्यासोबतच ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) विचारून जायला सांगतो. एका सामन्यामध्ये प्रशिक्षक माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी एक-दोन धावा काढा असं सांगितलं होतं. मात्र तेव्हा रोहित माझ्याजवळ आला आणि म्हणाला तुला जे मनात आहे ते कर, असा खास किस्सा इशानने सांगितला.
रोहित शर्मा एक हुशार कर्णधार आहे कारण कोणता फलंदाज कुठे फटका मारून झेल (Catch) देऊ शकतो याबाबत रोहित अनेक अंदाज बांधतो.
अनेकवेळा तो यशस्वीही ठरला असल्याचं इशान म्हणाला. राहुल चहर (Rahul Chahar) यशस्वी ठरण्यामागे रोहितचा मोलाचा वाटा आहे
कारण रोहितने अनेकवेळा त्यांचा आत्मविश्वास (Confidence) वाढवला आहे, असं किशन म्हणाला.
रोहित शर्मासोबत जशा पद्धतीने मी चेष्टा करू शकतो तशा पद्धतीने मी विराट कोहलीसोबत (Virat Kohli) करू शकत नाही.
कारण मी जास्तवेळ घालवला नाही, त्यामुळे माझी त्याच्यासोबत क्लोज बॉंन्डिंग नसल्याचं इशाने सांगितलं.
Web Title :- ipl 2022 mumbai indians ishan kishan express about rohit sharma captaincy virat kohli
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update