Mumbai Indians | ज्युनियर ‘एबीडी’नं केला ‘हा’ मोठा पराक्रम, मुंबई इंडियन्स झाली खुश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) मागच्या लिलावामध्ये एक युवा दक्षिण आफ्रिकन (South Africa) खेळाडूला विक्रमी बोली लावून आपल्या संघात सामील करून घेतले होते. त्यानं आयपीएलच्या (IPL) काही सामन्यात आपल्या कामगिरीने छाप पाडली होती. हा खेळाडू आता दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये दमदार फलंदाजी करताना दिसत आहे. त्याने नुकत्याच एका पार पाडलेल्या सामन्यात एका विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. या खेळाडूचे नाव आहे डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brewis). या खेळाडूला ज्युनिअर एबीडी म्हंटले जाते. डेवाल्ड ब्रेविस हा दक्षिण आफ्रिकेचा माजी महान फलंदाज एबी डिव्हिलर्स (AB Devillers) सारखी चौफेर फटकेबाजी करतो म्हणून त्याला ज्युनिअर एबीडी हे नाव पाडण्यात आले आहे. (Mumbai Indians)

 

 

ब्रेविसची विक्रमी कामगिरी

पोशेफस्ट्रूममध्ये झालेल्या टायटन्स आणि नाईट्स संघातल्या सामन्यात ब्रेविसने एक विक्रमी कामगिरी केली आहे. त्यानं टायटन्सकडून खेळताना अवघ्या 35 बॉलमध्ये शतक ठोकलं. तर 57 बॉलमध्ये नाबाद 162 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 13 फोर आणि 13 सिक्सर्सचा समावेश होता. टी20 क्रिकेटमध्ये ब्रेविसची ही खेळी तिसरी मोठी खेळी ठरली. याआधी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनं (Chris Gayle) आयपीएलमध्ये 175 धावा ठोकल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅरॉन फिंचनं (Aaron Finch) 172 धावांची खेळी केली होती. (Mumbai Indians)

क्रिकेटविश्वातून कौतुक

ब्रेविसच्या या खेळीचं क्रिकेटवर्तुळात मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.
एबी डिव्हिलियर्ससह अनेक खेळाडूंनी ट्विट करत त्याच्या या कामगिरीची तारीफ केली आहे.
ब्रेविस दक्षिण आफ्रिकेच्या आगामी टी20 लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या एमआय केपटाऊन (MI Cape Town)
संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या सामन्यादरम्यान ब्रेविसने फक्त फलंदाजीनेच नाहीतर आपल्या
फिल्डिंगनेदेखील सगळ्यांचे मन जिंकले आहे. त्याचा बाउंड्री लाईनवर पकडलेल्या एका कॅचचा व्हिडिओ सध्या
सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Web Title :-  Mumbai Indians | south african youngster and mumbai indians player dewald bravis hits massive sentury

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gas Cylinder Price | महागाईने होरपळलेल्या जनतेला मोठा दिलासा ! गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 115 रुपयांची कपात

KRK ने यावेळी चक्क सलमान खानची मागितली माफी, काय आहे नेमके प्रकरण?