IPL-14 : 48 तासात मोडला पृथ्वी शॉ चा विक्रम, पोलार्डने केल्या सर्वात वेगवान ‘फिफ्टी’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) -14 च्या 27 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (एमआय) ने चेन्नई सुपर किंग्ज(सीएसके) ला 4 विकेटने पराभूत केले. मुंबईच्या विजयाचा हिरो फलंदाज किरोन पोलार्ड ठरला. त्याने 34 चेंडूवर नाबाद 87 धावांची खेळी केली. पोलार्डने 8 षटकार आणि 6 चौकार मारले. त्याला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाले.

पोलार्डने अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या या सीझनचे हे सर्वात वेगवान अर्धशतक होते. त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या पृथ्वी शॉला मागे टाकले. शॉ ने गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध 18 चेंडूत अर्धशतक बनवले होते. ओव्हरऑल आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे. त्याने 2018 च्या सीझनमध्ये 14 चेंडूत अर्धशतक बनवले होते. पंजाब किंग्जच्या केएल राहुलने दिल्ली डेयरडेव्हिल्स विरूद्ध ही कामगिरी केली होती.

लिस्टमध्ये दुसर्‍या नंबरवर केकेआरचा सुनील नरेन आहे. त्याने 2017 च्या सीझनमध्ये 15 चेंडूत अर्धशतक केले होते. नरेनने ही कामगिरी आरसीबी विरूद्ध केली होती. यूसुफ पठाणने सुद्धा 15 चेंडूत अर्धशतक बनवले आहे. त्याने 2014 मध्ये केकेआरकडून खेळताना ते केले होते.

सुरेश रैना (16 चेंडू)- सीएसके विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, आयपीएल- 2014
क्रिस गेल (17 चेंडू)- आरसीबी विरूद्ध पुणे वॉरियर्स, आयपीएल- 2013
एडम गिलक्रिस्ट (17 चेंडू)- डेक्कन चार्जर्स विरूद्ध दिल्ली डेयरडेव्हिल्स, आयपीएल- 2009
क्रिस मॉरिस (17 चेंडू)- दिल्ली डेयरडेव्हिल्स विरूद्ध गुजरात लॉयन्स, आयपीएल- 2016
सुनील नरेन (17 चेंडू)- केकेआर विरूद्ध आरसीबी, आयपीएल- 2018
किरोन पोलार्ड (17 चेंडू)- मुंबई इंडियन्स विरूद्ध केकेआर, आयपीएल- 2016
निकोलस पूरन (17 चेंडू)- किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध सनरायजर्स, आयपीएल- 2020
ईशान किशन (17 चेंडू)- मुंबई इंडियन्स विरूद्ध केकेआर, आयपीएल-2018
हार्दिक पंड्या (17 चेंडू)- मुंबई इंडियन्स विरूद्ध केकेआर, आयपीएल- 2019
किरोन पोलार्ड (17 चेंडू)- मुंबई इंडियन्स विरूद्ध सीएसके, आयपीएल-2021

मुंबईने 4 विकेटने जिंकली मॅच
सीएसकेने या मॅचमध्ये पहिली फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 4 विकेटमध्ये 218 धावा बनवल्या. अंबती रायडूने 27 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या. त्याने केवळ 20 चेंडूत अर्धशतक बनवले. उत्तरादाखल मुंबईच्या टीमने 6 विकेट गमावून 219 धावांचे लक्ष्य गाठले. मुंबईचा या सीझनमधील हा चौथा विजय आहे. 8 गुणांसह ते मालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. तर, सीएसके 10 गुणांसह टॉपवर कायम आहे.