इंदू मिल स्मारक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ, अनेक मंत्री नाराज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  मुंबईतील दादर येथील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. या जागेवर आज (शुक्रवार दि 18 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पायाभरणी सोहळा पार पडणार आहे. अनेक मंत्र्यांची यावेळी उपस्थिती असणार आहे. परंतु या समारंभावरून अनेक मंत्री नाराज असल्याची माहिती समजत आहे.

अनेक मंत्र्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण पोहोचलं नाही. तर अनेकांना या कार्यक्रमाची माहिती देखील नाही. याशिवाय जे मंत्री उपस्थित राहणार आहेत त्यांनाही अगदी कमी कालावधीत या कार्यक्रमाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत किंवा नाही याबाबत अजून काही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

बाबासाहेबांच्या या राष्ट्रीय स्मारकाचा प्रकल्प MMRDA पूर्ण करणार आहे. याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे असतील –

– स्मारकाची उंची 450 फूट
– पुतळ्याची उंची 350 फूट
– स्मारकाचा एकूण खर्च 1000 कोटी पर्यंत जाण्याची शक्यता
– हा खर्च MMRDA अंतर्गत करण्यात येणार आहे.
– पुढील 3 वर्षात स्मारक पूर्ण होईल
– बौद्ध वास्तूरचना शैलीतील घुमट
– संग्रहालय आणि प्रदर्शन भरवण्याची व्यवस्था
– स्मारकाच्या एकूण जागेपैकी 68 टक्के जागा ही खुल हरीत जागा असेल
– स्मारकाच्या उत्कृष्ट कामासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मतं घेतली जाणार आहेत.