मुंबई विमानतळावर पुन्हा धमकीचा कॉल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर धमकीचा फोन आल्याचे वृत्त आल्याने एकच खळबळ उडाली. शनिवारी सकाळी अकरा वाजता आलेल्या या कॉलनंतर सुरक्षेच्या कारणासाठी टर्मिनल २ वरील तीन मजले रिकामे कऱण्यात आले. बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमीटीने (बीएटीसी) नंतर तपास केल्यावर हा कॉल बनावट असल्याचे समोर आले.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्टीय विमानतळावर शनीवारी सकाळी धमकीचा फोन आला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमीटी (बीटीएसी) कडून मुंबई विमानतळावर सुरक्षेसाठी एक बैठक बोलविण्यात आली. सावधगिरीचा उपाय म्हणून टर्मिनल २ मधील दुसरा, तिसरा आणि चौथा मजला रिकामा करण्यात आला. त्यानंतर पडताळणी केल्यावर हा कॉल बनावट असल्याचे समोर आले आहे. तरीही विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा चोख ठेवण्यात आली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर देशात हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर विमानतळाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तसेच विमानतळावरील तपासणी आता कडक करण्यात आली आहे.