28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान मुंबई रंगणार ‘अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये 16 वा मुंबई अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 28 जानेवारीपासून 3 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये डॉक्यूमेंट्री, लघुचित्रपट आणि अ‍ॅनिमेशन चित्रपट दाखवले जाणार आहेत. हा महोत्सव अधिक आकर्षक करण्यासाठी मंत्रालयाने यावेळेस व्ही शांताराम पुरस्कारासह अन्य अनेक पुरस्कार सुरू केले आहेत.

हे पुरस्कार 3 फेब्रुवारीला प्रदान करण्यात येतील. महोत्सवात सहभागी होण्यासाठी यावेळेस देशातील 729 प्रवेशांसह 24 देशांना प्रवेशिका मिळाल्या आहेत. यामध्ये विशेषकरून युरोपियन संघाच्या चित्रपटांचा समावेश असणार आहे. महोत्सवात रशियाचे अ‍ॅनिमेशन चित्रपट, फिनलँड आणि बुल्गेरियाचा ऑस्कर नामांकित फाउवे, कॅनडाचा लघु चित्रपट फयूवा, कॅनडाचा डिटेंनमेंट आणि फ्रान्सचे लघुचित्रपट रात्री गार्डनमध्ये दाखवले जाणार आहेत.

यासह सत्यजीत रे यांचे लघुचित्रपट ज्यामध्ये रविंद्रनाथ टागोर, द इनर आय, पीकू सारखे लघुचित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. यावेळेस आयर्लंड हा देश लक्षवेधक असणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेचे चित्रपटही खास आकर्षण असणार आहेत. यामध्ये एफटीआयआय, एसआरएफटीआय, एनआयडी, एफटीआयटी, सृष्टी आणि क्राफ्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अ‍ॅनिमेशन, शार्ट आणि डाक्यूमेंट्री फिल्म पाहण्याची संधी या महोत्सवात मिळणार आहे.

कार्यशाळेचे आयोजन
या महोत्सवात अंतरराष्ट्रीय स्तरावरील संपादन कार्यशाळा, ड्रोन फोटोग्राफी, एनिमेटर मायकल डुडोक डे विट आणि थॉमस वॉ सारख्या ज्येष्ठ निर्मात्यांच्या कार्यशाळांचे अयोजन करण्यात येणार आहे. महात्मा गांधी यांची 150वी जयंती आणि सत्यजीत रे यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासह देशातील प्रसिद्ध दिवंगत चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटांचे स्क्रीनिंग आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली जाणार आहे.

महोत्सवात लघु, अ‍ॅनिमेशन आणि वृतचित्र श्रेणीत सर्वश्रेष्ठ चित्रपटांना रोख रक्कमेचे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाला 10 लाख रोख रक्कमेचा गोल्डन शंक्ष पुरस्कार देण्यात येणार आहे. तर अन्य पुरस्कारांमध्ये 1 ते 5 लाखांपर्यंतचे सिल्व्हर शंख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र आहे. यावेळेस जल संरक्षण आणि जलवायु परिवर्तनावर सर्वोत्कृष्ट लघु चित्रपटाचा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/