ब्रेकिंग : IPS देवेन भारतींची तडकाफडकी बदली ; राज्य पोलिस दलात खळबळ

वरिष्ठ अधिकार्‍याशी कोल्ड वॉर चालु असल्याने बदली ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक आयोगाने मुंबईचे सह पोलिस आयुक्‍त देवेन भारती यांची अचानकपणे बदली केली आहे. त्यामुळे संपुर्ण राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. निवडणूकी दरम्यानच्या काळात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी देवेन भारती यांची बदली लांबवण्यात आली होती. मात्र, निवडणुक आयोगाने देशातील काही आयपीएस अधिकार्‍यांच्या काल (शनिवारी) रात्री तडकाफडकी बदल्या करण्यास संबंधित राज्यातील प्रमुखांना सुचना केल्या आहेत. त्यामध्ये देवेन भारती यांचा समावेश आहे.

गेल्या अनेक वर्षापासुन देवेन भारती हे मुंबई पोलिस आयुक्‍तालयात वेगवेगळया पदावर कार्यरत आहेत. लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येवुन ठेपल्या असताना भारती यांची बदली झाल्याने खळबळ उडाली आहे. भारती यांच्या बदलीचे सर्वत्र आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे. राज्य सरकारने भारती यांची बदली लांबविली होती. त्याबाबतचा प्रस्ताव देखील राज्य सरकारने निवडणुक आयोगाकडे दिला होता. राज्यात पहिल्या टप्पयातील मतदान हे दि. 11 एप्रिल रोजी होत आहे तर चौथ्या टप्प्यातील मतदान हे दि. 29 एप्रिल रोजी होणार आहे. मुंबईचे सह आयुक्‍त म्हणुन आता कोणाची नेमणुक होणार या चर्चेला उधाण आले आहे. सह आयुक्‍त पदासाठी प्रामुख्याने 3 अधिकार्‍यांची नावे चर्चेत असल्याची माहिती पोलिस दलातील विश्‍वसनीय सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, निवडणुक आयोगाने पश्‍चिम बंगालमधील काही वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. आयपीएस अधिकारी डॉ. राजेश कुमार कोलकताचे नवे पोलिस आयुक्‍त असणार आहेत तर नटरंजन रमेश बाबू हे बिधाननगरचे पोलिस आयुक्‍त असणार आहेत.

मुंबईचे सह आयुक्‍त देवेन भारती यांच्या बदलीमुळे संपुर्ण राज्य पोलिस दलात खळबळ उडाली आहे. यापुर्वी राज्य सरकारने भारती यांची बदली लांबविलेला प्रस्ताव निवडणुक आयोगाने मान्य केला होता. आता अचानक काय झाले की, भारती यांची निवडणुक आयोगाने बदली केली अशी चर्चा सध्या रंगली आहे. दरम्यान, मुंबई पोलिस दलातील कोल्ड वॉरमधून भारती यांची बदली झाली आहे अशी देखील चर्चा सध्या होत आहे. देवेन भारती यांनी एका अति वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍याची मुंबई पोलिस दलात नियुक्‍ती होवु नये म्हणुन प्रयत्न होते अशी चर्चा आहे आणि त्यामधुनच त्यांची आता बदली झाली आहे असे बोलले जात आहे. दरम्यान, सह आयुक्‍त देवेन भारती यांचे सध्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्यासोबत अतिशय चांगले संबंध असल्याचे सर्वश्रुत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us