Mumbai Khar Police Arrest Navneet Rana and Ravi Rana | नवनीत राणा आणि रवी राणांना पोलिसांकडून अटक; केला ‘या’ कलमान्वये गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Khar Police Arrest Navneet Rana and Ravi Rana | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’ वर (Matoshree) जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणाचा निर्धार करणाऱ्या अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक (Mumbai Khar Police Arrest Navneet Rana and Ravi Rana) केली आहे. मुंबईतील (Mumbai) खार येथील पोलीस स्टेशनमध्ये (Khar Police Station) राणा दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दुपारी पोलीस राणा यांच्या घरी गेले त्यावेळी राणा दाम्पत्याने पोलिसांसोबत हुज्जत घातली मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

 

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दुपारी आपण आपलं आंदोलन मागे घेत असल्याचं पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं. मात्र दुपारी ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य करणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि शांतता भंग करणे असे गुन्हे 153 अ कलमाखाली दाखल केले आहेत. नवनीत राणा यांनी फेसबुक लाईव्ह (Facebook Live) करत पोलीस त्यांना जबरदस्तीने घेऊन जात असल्याचा दावा केला आहे.

मी पंचवीस लाख लोकांचं नेतृत्व करते पण या पद्धतीची गुंडशाही याआधी आम्ही कधीही महाराष्ट्रात पाहिली नाही.
खासदार, आमदारांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून पोलीस स्टेशनपर्यंत नेलं जात आहे.
आमच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस आम्हाला कोणतेही वॉरंट न दाखवता घेऊन जात असल्याचं राणा यांनी सांगितलं.

 

दरम्यान, आम्हाला जर अटक केली तर आम्ही जामीन घेणार नाही, असं राणा म्हणाल्या.
त्यासोबतच नवनीत राणा यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना मदतीचं आवाहन केलं आहे.

 

Web Title :- Amravati MP Navneet Rana and her husband MLA Ravi Rana arrested under section 153A by Khar Police Mumbai Police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा