Mumbai-Kolhapur Special Train | मुंबई-कोल्हापूर विशेष सेवा सुधारित क्रमांक व संरचनेसह धावणार

पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai-Kolhapur Special Train | रेल्वेने (Railway) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus), मुंबई आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (Shree Chhatrapati Shahu Maharaj Terminus), कोल्हापूर (Mumbai-Kolhapur Special Train) दरम्यान धावणाऱ्या विशेष ट्रेन क्र. 01411/01412 गाडीस दिनांक १.७.२०२१ पासून पूर्ववत चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

तथापि, दिनांक १.११.२०२१ पासून ही विशेष गाडी सुधारित ट्रेन क्रमांक व संरचनेसह चालविण्याचे ठरविले आहेः

सुधारित क्रमांक: दिनांक ०१.११.२०२१ पासून विशेष ट्रेन क्रमांक 01411 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुधारित ट्रेन क्रमांक 07411 नुसार तर विशेष ट्रेन क्रमांक 01412 विशेष गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून सुधारित ट्रेन क्रमांक 07412 नुसार धावणार आहे.

सुधारित संरचनाः एक प्रथम श्रेणी वातानुकुलीतसह द्वितीय वातानुकुलीत, एक द्वितीय वातानुकुलीत, तीन तृतीय वातानुकुलीत, १२ शयनयान आणि 4 द्वितीय श्रेणी आसन.

टीप :- या गाड्यांची वेळ, वारंवारता आणि थांबे यामध्ये कोणताही बदल राहणार नाही

तपशीलवार थांबे आणि वेळांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी सर्व प्रकारच्या मानदंडांचे, कोविड-१९शी संबंधित मानकांचे पालन अनिवार्य असणा-या या विशेष ट्रेनमध्ये फक्त आरक्षित तिकीट असणार्‍या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी दिली जाईल.

हे देखील वाचा

Rupali Chakankar । ‘बायको जात चोरते, नवरा राजदंड पळवतो’; ‘या’ दांपत्याला राष्ट्रवादीचा खोचक टोला

Police Suicide News | तरूण पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

Pune Police News । RTI कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेचे 9 ‘फॉलोअर्स’ पुणे पोलिसांच्या ‘रडार’वर

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Mumbai-Kolhapur Special Train | Mumbai-Kolhapur Special Train with revised train number and composition

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update