Mumbai Local Mega Block | मध्य रेल्वेवर 72 तासांचा मेगा ब्लॉक; 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Local Mega Block | एक्स्प्रेस गाड्यांना (Express Trains) स्वतंत्र मार्ग उपलब्ध होण्यासाठी मध्य रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम जलद गतीने सुरू आहे. दि. 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम करण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेवर 72 तासांचा मेगा ब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेण्यात येणार आहे. त्यानंतर 6 फेब्रुवारीला पाचवी आणि सहावी मार्गिका खुली होणार आहे. यामुळे मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका (Separate Lines) उपलब्ध होईलच पण त्याचबरोबर लोकलचे वेळापत्रकही (Local Schedule) सुधारेल, असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे (Mumbai Railway Development Corporation) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रवी अग्रवाल (Ravi Agarwal) यांनी सांगितलं आहे.

ठाणे – दिवा (Thane-Diva) दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या विविध कामासाठी डिसेंबरला 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान, मेगाब्लॉक घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. या नियोजनानुसार डिसेंबरमध्ये 18 तासांचा तर जानेवारीत 24 आणि 36 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात (Mumbai Local Mega Block) आला होता. त्यानंतर 23 जानेवारीला 14 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. मध्यरात्री 1.30 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 3.20 वाजेपर्यंत हा ब्लॉक राहील. या दरम्यान होणाऱ्या लोकलच्या 300 फेऱ्या रद्द होतील. त्यानंतर मात्र सर्वात मोठा 72 तासांचा मेगाब्लॉक होईल. यावेळी लोकल फेऱ्या रद्द होतीलच पण मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रक यावर परिणाम होईल.

पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर फायदा काय ?

मध्य रेल्वेची पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर प्रवासी क्षमता अडीच ते तीन लाखाने वाढण्याची शक्यता आहे. शिवाय 100 पेक्षा जास्त लोकल वाढू शकतात. त्यामुळे हे काम महत्त्वपूर्ण असून 72 तासांचा हा मेगाब्लॉक शेवटचा असेल. आतापर्यंत कल्याण ते दिवा (Kalyan to Diva)आणि ठाणे ते कुर्ल्यापर्यंत (Thane to Kurla) पाचवी आणि सहावी मार्गिका झाली आहे. ठाणे ते दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेचं काम गेली दहा वर्षे रखडलं होतं. २०१९च्या मार्च महिन्याची अंतिम मुदत असतानाही अनेक वेळा त्यात बदल करण्यात आले. त्यानंतर जून 2021 ही अंतिम मुदत ठरवण्यात आली.
पण कोरोना (Corona) आणि लॉकडाऊन (Lockdown) कमी मनुष्यबळ आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे या कामात पुन्हा अडथळा आला.
त्यामुळे ही मार्गिका मार्च 2022 च्या आता पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Web Title : Mumbai Local Mega Block | mumbai local mega block72 hour jumbo block on
central railway between february 4 and 6 and 5th 6th line will open on february 6

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या

 

Income Tax Saving Tips | आई-वडिलांची देखभाल करून सुद्धा वाचवू टॅक्स, जाणून घ्या काय आहे नियम