Mumbai Local Train | प्रसिद्धीसाठी नेत्यांची लोकल बाबत वक्तव्ये; मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलचा (Mumbai Local Train) प्रवास गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे बंद आहे. यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना रोजगारास मुकावे लागले आहे. परिणामी लोकल कधी सुरु होणार असा प्रश्न अनेक दिवसांपासून विचारला जात आहे. मध्यंतरीच्या काळात लोकल सुरु करण्यात आली होती. मात्र, पुन्हा बाधितांची संख्या वाढू लागल्याने सर्वसामान्यांसाठी लोकल (Mumbai Local Train) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Raddish | मुळ्यासोबत ‘या’ गोष्टी कधीच खाऊ नका नाहीतर होऊ शकतात गंभीर आजार

राज्य सरकारकडून अद्यापर्यंत लोकल सुरु करण्याबाबत कोणतीही निर्णय झाला नसतानाही काही मंत्री विनाकारण लोक आज सुरु होईल, उद्या सुरु होईल. किंवा बाधितांच्या आकडेवारीवरून लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगताना दिसत आहे. त्यामुळे ही मंडळी केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठीच हे उद्योग करत असल्याची चर्चा प्रवाशांतून सुरु झाली आहे.

White Fungus | काळी पेक्षा पांढरी बुरशी अधिक धोकादायक का आहे? जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपचार

गेल्या दीड वर्षापासून राज्यात लॉकडाऊन सदृश्य स्थिती आहे. मध्यंतरीच्या काळात महिलांसाठी तसेच ठराविक वेळेत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आली होती. तेवढा कालावधी वगळला तर लोकलने सामान्यांना प्रवासमुभा देण्यात आलेली नाही. पोटा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी अनेक जण रोजगारासाठी मुंबईत येत असतात.मात्र लोकल बंद केल्याने त्यांच्या रोजगारावर एकप्रकारे संकट आले असून, ते लोकल प्रवासाची सेवा आतुरतेने वाट पाहत आहेत.

Sharad Pawar | शरद पवारांचा नाना पटोलेंना टोला, म्हणाले – ‘लहान माणसावर बोलणार नाही’

शनिवारी काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार म्हणाले, राज्यातील कोरोना स्थितीचा दर शुक्रवारी टास्क फोर्सकडून आढावा घेतला जातो. त्यानंतर निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेतला जातो. सध्या स्थिती नियंत्रणात येत आहे मात्र, धोका अद्याप कायम आहे. अजूनही बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यातच तिसऱ्या लाटेचा धोकाही वाढताना दिसत आहे.

Mumbai Local Train ministers are misleading citizens over local trains says mumbaikars

त्यामुळे वस्तुस्थितचा आढावा घेऊनच निर्बंध हटवण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले, लोकल बंद असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे हे मान्य आहे. सध्याच्या परिस्थितीचा आढावा तसेच कोरोनाची तिसरी लाट यांमुळे सामान्यांना कशा प्रकारे लोकलप्रवासास मुभा देता येईल यावर विचार सुरु आहे. सगळ्या निकषांचा आम्ही विचार करतोय. जोपर्यंत ५० ते ६० टक्के नागरिकांना लसीकरण होत नाही, तोपर्यंत निर्णय घेणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Pimpri Crime | चिखलीमध्ये भरदिवसा कोयत्याने सपासप वार करुन एकाचा निघृण खून

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याबाबत नागरिकांशी संवाद साधत
असतात. त्यांचे भाषण आहे हे समजल्यानंतर आज काही तरी तोडगा निघेल अशी अशा वाटत
असते मात्र, त्यांच्याकडूनही काही ठोस माहिती मिळत नाही. अशातच राज्य सरकारमधील काही मंत्री लोकल प्रवासाबाबत विधाने करत असल्याने गोंधळात भर पडत आहे. यामध्ये विजय वडेट्टीवार आणि अस्लम शेख हे दोन मंत्री आघाडीवर असल्याचे निरीक्षण सर्वसामान्य प्रवाशांनी नोंदवले आहे.
‘मुख्यमंत्र्यांनी ठोस माहिती द्यावी’

Ahmadnagar News | कौटुंबिक वादाच्या प्रकरणात डॉक्टर व त्याच्या कुटूंबियांना जामीन

लोकल प्रवासाबाबत मंत्र्यांकडून होणाऱ्या वक्त्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी लोकल सुरु होण्याबाबत ठामपणे सांगायला हवे किंवा अजून सहा महिने तरी
लोकल सुरु होणार नाही असे सांगितले तर किमार त्या कालावधीसाठी पर्यायी साधनांबाबत नियोजन
करता येऊ शकते. मात्र ठाकरे यांच्याएवजी भलतेच मंत्री लोकल बाबत भाष्य करत आहे. त्यांच्या
उलटसुलट माहितीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून संताप व्यक्त होत आहे.

 ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Mumbai Local Train ministers are misleading citizens over local trains says mumbaikars

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update