Mumbai Local Train | मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! 15 ऑगस्टपासून मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा, पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Local Train | कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे कोरोना थोपवायचा असेल तर नियम पाळावेच लागणार आहेत. परंतु राज्याचं आर्थिक चक्रही चालणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यात, शहरात कोरोना कमी झाला आहे, अशा ठिकाणी निर्बंध शिथिल करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले. तसेच 15 ऑगस्टपासून मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा (Mumbai Local Train) दिली जाईल. परंतू ज्यांनी कोविडचे दोन डोस घेतले आहेत, अशांनाच लोकलने प्रवास करता येईल. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

अ‍ॅपच्या माध्यमातून पास
15 ऑगस्ट पासून मुंबई लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु होईल. पण लशीचे दोन्ही डोस घेऊन किमान 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच लोकलने प्रवास करता येईल. यासाठी एक अ‍ॅप (App) तयार करत असून या अ‍ॅपच्या आधारे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासासाठी पास (local travel Pass) घेता येईल. तसेच हा पास ऑफलाईन पद्धतीनेही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

टास्क फोर्सकडून आढावा घेणार

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सोमवारी आपण टास्क फोर्सकडून (task force) आढावा घेणार आहे. त्यानंतर आणखी कोणते निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करायचे याबाबत निर्णय घेतला जाईल. याला साधारण 8 ते 10 दिवस लागतील. त्यासाठी आपल्याला संयम ठेवावा लागेल. अनेकजण हे उघडा… ते उघडा अशा मागण्या करत उचापत्या करत होते, पण जनता त्यांना बळी पडली नाही, असंही ते म्हणाले.

‘या’ 8 जिल्ह्यातील कोरोनाचा धोका अधिक
पुणे, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बीड या जिल्ह्यांमध्ये अद्यापही कोरोना संसर्ग कायम असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त 6 जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले.

आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री

– मागील वर्षी पहिली लाट ओसल्यानंतर पुन्हा हळूहळू रुग्णांची वाढ सुरु झाली.

काही दिवसांपूर्वी आपण ठराविक जिल्ह्यांमध्ये दुकानांच्या वेळा वाढवल्या आहेत.
तसेच इतर निर्बंधही शिथिल केले. राज्यातील कोरोनाची स्थिती समिश्र आहे.
विशेष म्हणजे पूर येऊन गेलेल्या 6 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक असल्याचे दिसत आहे.

कोरोनामुक्तीसाठी आपण याआधीही कोरोनामुक्त गाव यासारख्या काही योजना राबवल्या होत्या. त्याला अनेक सरपंचांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Web Title :- Mumbai Local Train | mumbaikars allowed local travel from august 15 chief minister uddhav thackeray big announcement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

New LPG Connection | आता एका मिस्ड कॉलद्वारे मिळेल नवीन LPG कनेक्शन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

Neeraj Chopra Diet | सालमन फिश-चिकन आणि ब्रेड ऑमलेट, ‘या’ गोष्टींमध्ये दडलंय नीरज चोपडाच्या ताकदीचं ‘गुपित’

Pune Accident News | दुर्देवी ! दोन दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू