Mumbai Local Train | मुंबईची लोकल सुरु होण्याचे संकेत?, Local पावसाळी अधिवेशनानंतर धावण्याची शक्यता

मुंबई न्यूज़ (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – कोरोना संकटामुळे गेल्या वर्षभरापासून मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल बंद आहे. मध्यंतरीच्या काळात निर्बंध शिथील केल्यानंतर लोकल (Mumbai Local Train) काही दिवसांकरीता धावली मात्र, त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) आली त्यामुळे पुन्हा मुंबईकरांना लोकलच्या प्रवासासाठी प्रतिक्षाच करावी लागली. काही दिवसांपूर्वी दुसरी लाट ओसरू लागल्याने निर्बध शिथिल केले असून अनलॉकची (Unlock) प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे लोकल पुन्हा सामान्यांसाठी कधी धावणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल होते. मात्र, आता लवकरच लोकल सुरु होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. लोकल सुरु झाली तर सरसकट सर्वांना प्रवास करता येणार नाही. टप्प्याने सर्वांसाठी लोकल सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनानंतर (Rainy Convention) मुंबईकरांच्या सेवेत लोकल दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. mumbai local Train | wait is over here local train may be start from next week

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

लोकल प्रवास सुरु करण्यासाठी तीन टप्पे तयार करण्यात येत आहे.
सुरुवातीला महिला आणि दिव्यांग प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा मिळू शकते.
तर पावसाळी अधिवेशनानंतर सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती
सूत्रांनी दिली आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण (Delta plus variant patient) राज्यात आढळल्याने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यातच लोकलमधील गर्दी पाहता संसर्ग वेगाने परसण्याची भीति व्यक्त होत
असल्याने तीन टप्प्यात लोकस प्रवासास मुभा देण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरु केल्या आहेत.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात महिला आणि दिव्यांग प्रवासी, दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांखालील पुरुष आणि तिस-या टप्प्यात सर्वांसाठी लोकल सुरु होणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे.

काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ उतार कायम दिसत आहे.
गुरुवारी दिवसभरात राज्यात ९ हजार ८४४ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली तर ९ हजार ३७१ जणकोरोनामुक्त झाले असून १९७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title : mumbai local Train | wait is over here local train may be start from next week

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Ambil Odha Slum | शिवसेनेची जोरदार टीका, म्हणाले – ‘पुण्याची सूत्रे सध्या बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात’