BMC | कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबई लोकलनं प्रवास करण्याची मुभा?, पालिका घेणार लवकरच निर्णय

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  BMC। कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे मुंबई लोकल ट्रेनवर (Mumbai local train) बंधने आणली होती. त्यांनतर गेल्या काही महिन्यांपासून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंद केली होती. यांनतर सर्वसामान्यांची प्रवासाअभावी फरफट झाली. तर लोकल ट्रेनमधून सर्वसामान्य लोक प्रवास कधी करणार? हा प्रश्न उभा होता. लोकल ट्रेन कधी सुरु होणार याच्या प्रतीक्षेत सर्व सामान्य नागरिक आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरपालिका मुंबई लोकल ट्रेनबाबत महत्वाचा निर्णय घेणार असल्याचं समोर आलं आहे.15 जुलै रोजी एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईकरांसाठी लोकल सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. mumbai local train will start for common public bmc took decision soon who take two doses corona vaccine

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

15 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस (corona vaccine) घेतलेल्या मुंबईकरांसाठी लोकल सेवा सुरु करण्याची शक्यता आहे.
तसेच, अशा नागरिकांना कार्यालयात आणि अन्य ठिकाणी जाण्याची परवानगी देण्याचा विचार मुंबई महापालिका करत आहे. तर मुंबईत सध्या कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे.
परंतु, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली असल्याने राज्य सरकार (State Government) निर्बंध शिथील करताना विचार करत आहे.
दरम्यान, महापालिकेच्या होणाऱ्या या बैठकीमध्ये इतर निर्बंध तसेच नियमांतही शिथिलता आणण्यासंदर्भात घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले –

मुंबई लोकल ट्रेनमध्ये नागरिकांना कसं प्रवास करण्याची संधी देता येईल का? हॉटेल दुकानांची वेळ कशी वाढवता येईल? कपड्याची दुकानं कशी उघडता येईल? हे पाहत आहोत.
ट्रेनचा विचार करताना तिसऱ्या लाटेचा विचार करावा लागत आहे, 100 टक्के नागरिकांना त्रास होत आहे.
हे मान्य आहे. सर्व पॅरामीटरचा विचार करत आहे.
जोपर्यंत 50 ते 60 टक्के नागरिकांना लसीकरण होत नाही तोपर्यंत कठीण आहे.
असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Guardian Minister Aslam Sheikh) म्हणाले.

मंत्री विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

लोकल ट्रेनसंदर्भात कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा लागणार आहे.
त्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करणे अपेक्षित आहे. चर्चेनंतर जो काही निर्णय घेण्यात येईल याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः जनतेला देतील.
दरम्यान, दर शुक्रवारी टास्क फोर्सद्वारे राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जातो.
त्यानंतर निर्बंधांसंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जातो.
अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Vadettiwar) यांनी दिलीय.

Web Title : mumbai local train will start for common public bmc took decision soon who take two doses corona vaccine

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

DGP Sanjay Pandey | पोलीस महासंचालक संजय पांडे यांची पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट

Jimmy Shergill | अटकेप्रकरणी जिमी शेरगीलचा उलट आरोप; म्हणाला – ‘पोलिसांनी राईचा पर्वत केला’

Pune News | महिला डॉक्टरच्या बेडरुम-बाथरुमध्ये छुपे कॅमेरे, आरोपींना जामीन न मिळण्याची दक्षता घ्या, निलम गोऱ्हेंचे पुणे पोलिसांना निर्देश