Lockdown : वांद्रे ‘गर्दी’ प्रकरणावरून आता भाजप नेत्याचा नवा ‘दावा’, ‘व्हिडिओ’ केला प्रसिद्ध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वांद्रे येथे परप्रांतिय नागरिकांनी मंगळवारी गर्दी केली होती. या प्रकरणावरून आता राजकारण तापत असून गर्दी प्रकरणाला वेगवेगळी वळण मिळत आहे. या प्रकरणी विनय दुबे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरून भाजपवर टीका केली होती. त्यानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वेगळाच दावा केला आहे.

वांद्रे येथे मंगळवारी हजारो लोकांनी एकच गर्दी केल होती, हा कट होता असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या घटनेच्या आधीचा एक व्हिडिओ सोमय्या यांनी राज्य सरकार आणि पोलिसांना दिला आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुण हे घरी जाण्यासाठी इथं जमलो असल्याचे सांगत आहेत. तसेच, ज्या तरुणाने हा व्हिडिओ रेकॉर्ड आहे, तो तिथे जमलेल्या तरुणांना ‘घरी जाऊ द्या किंवा 15 हजार रुपये द्या’ असं बोलण्यास सांगत आहे. हा व्हिडिओ किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. वांद्रे स्टेशन बाहेर जमलेली ती लोकं स्थानिकच होती. ही सर्व लोकं आजूबाजूच्या शास्त्रीनगर वसाहतीमधील होती. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री वियन दुबे याला अटक केली आहे.

वांद्रे येथील गर्दीमागे मोठं षडयंत्र ?
वांद्रे येथे घडलेला प्रकार धक्कादायक होताच पण त्यामागे खूप मोठं षडयंत्र असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी समोर आलेल्या व्हिडिओ नीट पाहीला तर त्या ठिकाणी जमलेल्या मजूरांच्या हातात कोणत्याही प्रकारच्या बॅगा, सामान काहीच नव्हत. फक्त मजूर आपल्या गावी जमण्यासाठी जमले होते असे सांगितलं जात होतं. मात्र, या संपूर्ण प्रकारामागे खूप मोठं केनेक्शन आणि षड्यंत्र असल्याची चर्चा होती आहे.
राजकारण करू नका, शरद पवारांची विनंती

वांद्रे येथे कुणी तरी रेल्वे सुरु झाल्याची अफवा पसरवली आणि त्यामुळे हजारो लोकं या ठिकाणी जमा झाले होते. प्रामुख्याने आपण डिस्टसिंगच्या सूचना केल्या आहेत. त्याचे पालन केलं गेलं नाही. कुणीही अशा अफवा पसरवू नये, वांद्रे येथे जे घडलं ते पुन्हा घडू नये, याची खबरदारी घेतली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.