Mumbai Lockdown | ‘…तर मुंबईत Lockdown लागणार’ ! BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Lockdown | राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) रूग्ण संख्येने धुमाकूळ घातला आहे. राज्यासह मुंबईत कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासन आणि आरोग्य यंत्रणा चिंतेत पडली आहे. यातच मुंबईतील 1 ली ते 9 वी च्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत जमावबंदी लागू आहे. दरम्यान, दैनंदिन वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा लॉकडाऊन (Mumbai Lockdown) लागणार का? याची जोरदार चर्चा सुरू आहे. यानंतर आता मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आयुक्त इक्बाल सिंह चहल (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी महत्वपुर्ण माहिती दिली आहे.

 

आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले, ‘दररोज नोंद होणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येपैकी 80 टक्के रुग्ण हो ओमायक्रॉन (Omicron Corona Variant) बाधितांचे आहेत. सध्या शहरात 30 हजार बेड्स उपलब्ध आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासबोत लॉकडाऊन, कठोर निर्बंधांबाबत चर्चा केली आहे. कठोर निर्बंध लावण्याच्या विरोधात अद्यापही आम्ही आहोत. जर एका दिवसात 20 हजार रुग्णांची संख्या ओलांडली तर कठोर निर्बंध (Strict Restrictions) लावण्याच्या संदर्भात विचार केला जाऊ शकतो. पूर्वी सारखा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट सध्या नाही. (Mumbai Lockdown)

 

पुढे चहल म्हणाले, ‘मुंबईत मागील काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता प्रभाव,
या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं (BMC) इमारत सील करण्याबाबत नवे प्रोटोकॉल जाहीर केलेत.
यापूर्वी 1 मार्च 2021 ला नियम निश्चित केले होते. पण, ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग जास्त असल्यामुळे या नियमांत काही सुधारणा केल्या आहेत.

‘एखादी इमारत अथवा इमारतीतील एखादी विंग यांच्यापैकी किमान 20 टक्के अथवा
त्याहून जास्त फ्लॅटमधील नागरिक कोरोना बाधित असल्याचं आढळले,
तर ती पूर्ण इमारत अथवा विंग सील केली जाणार असल्याचं ते म्हणाले.
तसेच या इमारतीत रुग्ण आणि इतर रहिवासी यांना कोरोनाबाबतच्या नियमावलीचं आणि होम क्वारंटाईनसाठीच्या
सर्व निकषांचं पालन करणे अनिवार्य असल्याचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) म्हणाले.

 

 

Web Title :- Mumbai Lockdown | will lockdown impose in mumbai due to coronavirus spike bmc commissioner iqbal singh chahal gives answer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMJDY | कोणत्याही बॅलन्सशिवाय ‘या’ लोकांना मिळू शकतो 10 हजार रुपयांपर्यंतचा लाभ, जाणून घ्या कसा?

 

Gold Silver Price Today | सुवर्णसंधी ! आजही सोन्या-चांदीच्या किंमती कमी; जाणून घ्या मुंबई, पुणे अन् नागपूरमधील आजचे दर

 

PDCC Election Results | पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार यांना मोठा धक्का? भाजपचे प्रदीप कंद विजयी, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच विजयाची नोंद, जाणून घ्या कोणाला किती मतं पडली