भाजपनं सांगितलं 48 तासात सरकार स्थापन करू, शिवसेनेनं दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सुरु असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या वादावरुन चांगलीच जुंपली आहे. दरम्यान भाजपकडून सांगण्यात आले की राज्यात पुढील 48 तासाच्या आत सरकार स्थापन होईल. भाजपने नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की महाराष्ट्रातील युती कायम राहिलं आणि सर्वांना लवकरच गोड बातमी मिळेल. आम्ही एकत्र आहोत.

24 ऑक्टोबरला निकाल आल्यानंतर भाजप शिवसेनेत सरकार स्थापन करण्यावरुन वाद सुरु झाला होता. तर राष्ट्रवादी, काँग्रेसला इतक्या जागा मिळाल्या नाहीत की ते सरकार स्थापनेचा दावा करु शकतील. त्यामुळे सर्वात मोठा आणि जास्त जागा मिळणारा पक्ष हा भाजपच आहे.

राज्यपालांना भेटतील भाजपचे नेते –
या संदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की राज्यपालांना आम्ही देखील भेटलो आहोत. सर्व पक्षांचे नेते राज्यपालांची भेट घेत आहेत. गुरुवारी भाजपचे प्रमुख नेते राज्यपालांची भेट घेतील. आम्ही मागील काही दिवसांपासून हीच मागणी करत आहे की सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आणि त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करावा.

शिवसेनेने केली भाजपवर टीका –
संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली की त्यांच्याकडे 145 चा आकडा आहे, जर सरकार बनते तर आम्हाला आनंदच आहे. जे सांगितले जात आहे की सर्व खोटे आहे कारण उद्धव ठाकरेंना कोणत्याही भाजप नेत्यांचा फोन आलेला नाही.

दुसरीकडे काँग्रेस राज्यसभेचे सदस्य हुसैन दलवाई यांची बुधवारी मुंबईमध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली. दलावईंनी भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संपर्क साधताना सांगितले की राऊत आणि त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून भाजपला सत्तेपासून दूर ठेवेल.

भाजप शिवसेना मिळून 161 जागा –
288 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणूकीचे आलेले निकालात कोणत्याही पक्षाला 145 चा जादूई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे सरकार स्थापन होण्यास उशीर होतं आहे. निवडणूकीत भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. युतीत निवडणूक लढणाऱ्या भाजप-शिवसेनेला 161 जागा मिळाल्या आहेत. विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरपर्यंत आहे.

Visit : Policenama.com