Video : Budget 2019 : नवभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज देशाचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहिर केला. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत. काहींनी सर्व घटकांचे हित लक्षात ठेवून तयार केलेला अर्थसंकल्प असल्याचे सांगितले आहे. तर काहींनी मध्यमवर्गीयांना निराश करणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या सर्वच नेत्यांनी मात्र या अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतुक केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यासंदर्भात प्रतिक्रिया दिली असून हे एक दूरदर्शी बजेट असल्याचे कौतुक त्यांनी केले. गाव, गरीब आणि शेतकऱ्यांमध्ये बदल घडवून आणणे हे या अर्थसंकल्पाचे लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचवेळी हा अर्थसंकल्प मोदींचे भारतीय अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलियन डॉलर ची अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न आणि दृष्टिकोन स्पष्ट करणारा आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा अर्थसंकल्प नवभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनीही अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे. देशाची आर्थिक स्थिती वाढवणारा हा अर्थसंकल्प असून यामध्ये अनेक वेगवेगळ्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. २०२२ पर्यंत सगळ्यांकडे स्वत:चे घर, गॅस कनेक्शन आणि शौचालय असणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये सर्व घटकांचा विचार करण्यात आला असून सामाजिक हित वाढवणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रीया योगींनी दिली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील हा अर्थसंकल्प देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक असा दुहेरी बदल घडवून आणणारा असल्याचे सांगितले आहे. आहे. या बजेटमुळे भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासाठी मदत होणार असून अर्थव्यवस्था मोठी झेप घेईल असेही त्यांनी म्हटले.

वजन कमी करायचंय मग ‘कच्ची केळी’ खा

‘हे’ माहित आहे का ? काही वाईट सवयी आरोग्यासाठी असतात चांगल्या

‘हे’ पदार्थ आहेत मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे शत्रू

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात