आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यामध्ये कोणकोण नेते बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला देखील एक कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असण्याची चर्चा आहे. याबद्दल आज रिपाइं चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आठवले गटाचे सरचिटणीस अविनाश महातेकरांना उद्या कॅबिनेट मंत्रिपद दिले जाईल असे सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मित्रपक्षासाठी सोडण्यात येणाऱ्या जवळपास २० जागांपैकी १० जागा रिपाइं ला देण्याची मागणी आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शिवसेनेशी बोलून किती आणि कोणत्या जागा सोडायच्या हे ठरवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रिपाइं सरचिटणीस अविनाश महातेकर यांची प्रतिक्रिया :

राज्यात कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याबद्दल आठवलेंचे विश्वासू सहकारी आणि जवळचे मित्र महातेकरांना विचारले असता याबद्दल आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले. रामदास आठवलेंनाही दोनदा मंत्रिपद दिल्याबद्दल भाजपाचे आभारही त्यांनी मानले. हि संधी रामदास आठवले यांनीच दिली आहे. दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचेही आभार त्यांनी मानले. आरपीआयला ५ टक्के पदं मिळायला हवीत असेहि त्यांनी यावेळी म्हटले.

शिवसेनेतून मंत्रिपद कोणाला :

उद्या होणाऱ्या मंत्रिपद विस्तारात शिवसेनेला २ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. यातील एक राष्ट्रवादीचे बंडखोर आणि नुकतेच शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना मिळण्याची शक्यता आहे. तर तानाजी सावंत आणि अनिल परब हेदेखील मंत्रिपदाचे दावेदार आहेत.

सिनेजगत

‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या मृत्यूनंतर झाले ‘असे काही’ की बनले ‘डिस्को डान्सर’

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत