ठरलं ‘या’ महिन्यात वाजणार अर्जुन मलायकाच्या लग्नाचा बँड 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या अफेअरची चर्चा सुरु आहे. अनेकदा या दोघांना मुंबईत हातात हात घालून फिरताना स्पॉट देखील केले गेले आहे. एवढेच नाही तर हे दोघे लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची देखील चर्चा आहे. आता ही जोडी येत्या एप्रिल महिन्यात मुंबईत बोहल्यावर चढणार आहे. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार असल्याचे अर्जुनच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

त्यातच अर्जुनने काही दिवसांपू्र्वी सोशल मीडियावर काळ्या रंगाच्या डिझायनर शेरवानीतील एक फोटो पोस्ट केल फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचे विशेष आभारही व्यक्त केले आहेत. अर्जुनने इन्स्टाग्रामवर त्याचे फोटो शेअर केले आहेत. त्याखाली साधे पण सुंदर दिसण्यात मदत करण्यासाठी विशेष आभार. असे लिहले आहे. त्यामुळे या फोटोतून अर्जुनचे लग्नाचे कपडे मनीष मल्होत्राचं डिझाईन करणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच मलाईका आणि अर्जुनची लग्नाची सरबराई सुरू आहे.