महाराष्ट्र : ‘हात’ कापून त्यानं प्रेयसीला लावलं ‘कुंकू’ अन् घेतली ‘सेल्फी’, त्यानंतर केला ‘खून’ अन् ‘आत्महत्या’

कल्याण : वृत्तसंस्था – कल्याण येथील निलम गेस्ट हाऊसमध्ये एका मुलीचा आणि मुलाचा मृतदेह शुक्रवारी आढळून आला होता. मुलाने पहिल्यांदा आपल्या प्रेयसीचा खून केला आणि त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मुलाने आपला हात कापून मुलीची रक्ताने मांग भरली. त्यानंतर तिच्यासोबत सेल्फी काढून तिचा खून करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.

अरुण कुमार गुप्ता (वय-२१ रा. आझमगढ, उत्तर प्रदेश) असे खून करून आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. तर प्रतीमा प्रसाद (वय-२१) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. अरुण आणि प्रतीमा यांची ओळख फेसबुकवर झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते. अरूणचे बारावी पर्यंत शिक्षण झाले असून तो त्याच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळतो. तर प्रतीमाचे एम-कॉम पर्यंत शिक्षण झाले असून ती एका बँकेत नोकरी करते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूणने वाराणसी येथे जात असल्याचे वडिलांना सांगून तो कल्याणमध्ये आला. कल्याण रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्याने प्रतीमाला बोलावून घेतले. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास ते दोघे नीलम गेस्ट हाऊसमध्ये आले होते. गेस्ट हाऊसच्या खोलीत गेल्यानंतर ते दोघे बाहेर आले नाही. रात्री साडेसातच्या सुमारास त्यांनी हॉटल कर्मचाऱ्यांकडे पाणी मागितले. रात्री साडेनऊच्या सुमारास हॉटेल कर्मचाऱ्यांनी जेवणासाठी त्यांना आवाज दिला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

हॉटेल व्यवस्थापकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी प्रतीमा बेडवर पडलेली दिसली. तर अरुण छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. अरूणने पहिल्यांदा प्रतीमाचा गळा आवळून खून केला नंतर आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

अरुणने प्रतिमाला आपल्यासोबत गावी यावे असा अग्रह केला असणार. मात्र, प्रतीमाने त्याला नकार दिल्याने त्याने हे कृत्य केले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

आरोग्यविषय वृत्त –