खिडकीची झडप अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू , कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – खिडकीची झडप अंगावर पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सदर व्यक्ती 32 वर्षीय असून तो एक इन्शूरन्स एजंट असल्याचं समजत आहे. दरम्यान सुनील हरीशचंद्र गावकर असं या मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. एका इमारतीच्या  खिडकीचा भाग निखळून त्यांच्या अंगावर पडला. या घटनेत शिकार झालेले सुनील यांना आपला जीव गमवावा लागला. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट भागात ही घटना घडली.

दरबारशॉ नावाच्या इमारतीखालून सुनील चालले होते. दरम्यान या इमारतीच्या  पाचव्या मजल्यावरुन खिडकीचा भाग निखळून त्यांच्या अंगावर पडला. या घटनेत सुनील गंभीर झाल्याचे समोर आले. जखमी झालेल्या सुनील यांना  नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रात्री उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना ही घटना घडली.

दरम्यान ही घटना  घडल्यानंतर इमारतीच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांना कळवले. पोलीस सुनील गावकर यांना जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात घेऊन गेले पण काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दरबारशॉ इमारतीच्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारण त्याच्याकडे इमारतीच्या देखभालीची जबाबदारी होती.

सुनील गावकर गोरेगाव येते वास्तव्यास होते. ते नेहमीप्रमाणे गुरुवारी दुपारी इन्शूरन्सचे चेक गोळा करण्यासाठी आले होते. ते दरबारशॉ इमारतीच्या खालून चालले होते. त्यावेळी ही घटना घडली. सुनील गावकर एशियाटीक लायब्ररीजवळ बसमधून उतरले व बॅलार्ड इस्टेटच्या दिशेने येत होते. त्यावेळी निखळलेली खिडकीची झडप त्यांच्या अंगावर पडली आणि ही घटना घडली.