श्रीमंत महिलांना खूष करण्याची ऑफर देऊन तरुणाला लूटले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीमंत महिलांबरोबर मिटिंग घ्यायची, त्यांच्याबरोबर एकांताच चर्चा करायची. त्यांना खूश करायचे. त्यातून मोठे कमिशन मिळेल, या आमिषाला एक उच्च शिक्षित तरुण बळी पडला. त्याला नोकरी तर मिळाली नाहीच उलट सव्वा लाख रुपये गमाविण्याची पाळी त्याच्यावर आली आहे.

मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला हेमराज वर्मा (वय ३२) हा नोकरीसाठी मुंबईत आला. मागील ९ वर्षांपासून तो अंधेरीत खासगी कंपनीत नोकरी करत होता. याच दरम्यान जानेवारीत त्याला एका महिलेने कॉल करून फ्रेंडशिप क्लबमधून बोलत असल्याचे सांगितले, क्लबमधील नोकरीची ऑफर दिली. फ्रेंडशिप क्लब अंतर्गत महिलेबरोबर मिटिंग घ्यायची. एका मीटिंगसाठी १८ हजार रुपये मिळतील, त्यापैकी १५ टक्के क्लबमध्ये जमा करायचे. उर्वरित रक्कम तुमचे कमिशन असेल, असे सांगितले. या आमिषाला बळी पडून वर्माने  नोकरीसाठी होकार दिला.

सीमेवर पाककडून गोळीबार सुरुच, तीन नागरिकांचा मृ्त्यू 

त्याला सुरुवातीला नोंदणीसाठी २ हजार रुपये भरावे लागेल, असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे त्याने पैसे भरले. पैसे परत मिळतील, असे सांगून त्याच्याकडून पहिल्या मिटिंगचे १० हजार रुपये घेण्यात आले. मिटिंगसाठी त्यानेच १४ हजार रुपये भरुन हॉटेलची रुम बुक केली. अशा प्रकारे त्याने विविध कारणांसाठी ७८ हजार रुपये तिने सांगितलेल्या खात्यावर पैसे जमा केले. त्यानंतर ज्या महिलेसोबत मिटिंग करायची होती तिने फोन घेणे बंद केले.

पहिली मिटिंग फसल्यानंतर त्याला तुमचे सर्व पैसे परत मिळतील, असे सांगून दुसऱ्या एका महिलेबरोबर मिटिंग करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी नोंदणी म्हणून पुन्हा १२ हजार रुपये घेण्यात आले. वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आमचा प्रतिनिधी तुमच्याकडे येईल, असे सांगून आणखी २० हजार रुपये घेतले गेले. तो प्रतिनिधी न आल्याने वर्मा याने दिलेल्या नंबरवर फोन केला असता तो बंद लागला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने साकीनाका पोलिसांकडे धाव घेतली.