आजारी असतानाही लावली निवडणूक ड्यूटी, मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याने आपल्याला कावीळ झालाय. रजा मिळावी असा कर्ज करूनही निवडणूक ड्यूटी लावली. पण तो अर्ज स्विकारला नाही. त्यानंतर ऑन ड्यूटी असताना प्रकृती खालवली आणि कस्तूरबा नंतर नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शनिवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. असा आरोप या महिला कर्मचाऱ्याचे नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी केला आहे.

कोण आहे महिला कर्मचारी

प्रीती आत्राम धुर्वे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या मंत्रालयाच्या सांस्कृतिक विभागात काम करतात.

आजारपणामुळे रजेचा अर्ज

प्रीती आत्राम धुर्वे यांनी १८ एप्रिल रोजी कावीळ झाली होती. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रजेसाठी अर्ज केला होता. मात्र शिवडी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा निवडणूक आय़ोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज मंजूर केला नाही. त्यामुळे कावीळ असूनही त्यांना १० दिवस उन्हात काम करावं लागलं. २९ एप्रिल रोजी मुंबईत मतदान प्रक्रिया पार पडली. त्या दिवशी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कस्तूरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर नायर मध्ये हलविण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कुटुंबियांचा आरोप

प्रीती यांना दीड वर्षांची जुळी मुलं आहेत. प्रीती यांच्या जाण्यानं पती लोकेशचीही प्रकृती अस्वस्थ आहे. प्रीती या आजारी असूनही त्यांना बळजबरीने निव़णूकीचे काम करण्यास भाग पाडल्याचा आरोप कुटुंबिय आणि नातेवाईकांनी केला. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कुटुंबियांना १५ लाखांची मदत

प्रीती यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव निवडणूक आयोगाला जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी पाठविला आहे. कर्तव्यावर असताना निधन झाल्याने त्यांना मदत जाहीर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

निवडणूक आयोगाला कुठलंही पत्र नाही

प्रीती यांच्या निधनाबद्दल तीव्र दुख झालं आहे. परंतु प्रीती लोकेश आत्राम यांचं कुठलंही पत्र निवडणूक आयोगाला प्राप्त झालं नाही. असं उपजिल्हाधिकाऱी बाळासाहेब वाकचौरे यांनी सांगितलं. आम्हाला किमान ५० पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले. त्यांना रिलिव्हही केले. परंतु प्रीती यांचा अर्ज असता तर दखल घेतली असती. त्या आजारी असल्याचं सांगितल्यावर त्यांना लागलीच घरी जाण्यासाठी गाडी देण्यात आली. पण त्यांनी फक्त स्टेशनला सोडण्याची विनंती केली असे सांगितलं.