Video : ‘कंगना’वर भडकल्या मुंबईच्या महापौर, म्हणाल्या – ‘2 टक्क्यांच्या लोकांना न्यायालयाला राजकारणाचा आखाडा बनवायचाय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई हायकोर्टने मुंबई महापालिकेच्या कारवाई विरूद्ध दाखल कंगना राणावतची याचिका स्वीकारली आहे. कंगना राणावतच्या कार्यालयाच्या झालेल्या तोडफोडीला कोर्टाने चुकीचे म्हटले आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे वक्तव्य समोर आले आहे. किशोरी पेडणेकर यांनी म्हटले, आम्ही सुद्धा हैराण आहोत. एक अभिनेत्री जी राहते हिमाचलमध्ये आणि आमच्या मुंबईला पीओके म्हणते. जे दोन टक्क्यांचे लोक न्यायालयाला राजकीय आखाडा बनवू पहात आहेत ते चुकीचे आहे. कारण हे प्रकरण सूडाचे नाही. त्यांना सोशल मीडियावर खुप ट्रोल केले गेले. कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याचा अभ्यास करू.

मुंबईच्या महापौर म्हणाल्या, शिवसेना शासित बीएमसी कंगना राणावतच्या बंगल्याची तोडफोड करण्याच्या प्रकरणात पुढील कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करू. इतकेच नव्हे, त्यांनी कंगनासाठी आक्षेपार्ह भाषेचा सुद्धा वापर केला आहे.

न्यूज एजन्सी एनआयनुसार, त्यांनी म्हटले की, मुंबई महानगर कायदा कलम 354 ए च्या बाबातीत उच्च न्यायालयाद्वारे यापूर्वी दिलेले आदेशसुद्धा पाहिले जातील. कलम 354 ए महापालिका आणि त्यांच्या अधिकार्‍यांना सुद्धा अवैध बांधकाम रोखण्याचा अधिकार प्रदान करतो. त्यांनी म्हटले, कंगनाला एमएमए कायद्यांतर्गत 354 ए नोटीस जारी करण्यात आली आणि योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात आले.

You might also like