बोंबाबोंब ! ऑनलाइन सेक्सनंतर स्वतःचाच व्हिडीओ WhatsApp वर आला अन्…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अश्लील व्हिडीओ पाठवून ११ हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार मिरा रोड येथे समोर आला आहे. डेटिंग साइटवर ऑनलाइन सेक्स केल्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हाट्सअॅप वर व्हिडीओ पाठवून तरुणाला ब्लॅकमेल करण्यात आले. त्यानंतर पैसे नाही दिले तर व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रतिष्ठित खासगी कंपनीत नोकरी करणारा ३७ वर्षीय तरुण मिरा रोड परिसरात आपल्या पत्नीसोबत राहतो. त्याची पत्नी गर्भवती असून, ती आपल्या माहेरी गेल्याने तो घरात एकटाच राहतो. त्याने आपल्या मोबाइलवर डेटिंग अॅप डाउनलोड केले आणि नंतर मुलींसोबत चॅटिंग करण्यास सुरुवात केली. एका रात्री त्यास डेटिंग साइट वरुन एक फोन आला. फोन करणाऱ्या समोरील मुलीने त्याला ऑनलाइन सेक्सची ऑफर दिली. ३० मिनिटांच्या सेक्ससाठी पाचशे रुपये घेत असल्याचं तिने सांगितलं. तसेच या तरुणाने त्यास होकार दिला.

२३ ऑगस्ट रोजी व्हिडीओ कॉलमार्फत दोनदा ऑनलाइन सेक्स केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अश्लील व्हिडीओ त्याच्या व्हाट्सअॅप क्रमांकावर आला. त्यानंतर काही वेळातच त्याला मेसेज येऊ लागले. मेसेज करणाऱ्या मुलीने त्याला ११ हजार रुपयांची मागणी केली. हा व्हिडीओ डिलीट करण्यासाठी पैसे दे, नाहीतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसार करेल, अशी धमकी तिने दिली.

दरम्यान, यानंतर तरुणाने तातडीने मिरा रोड पोलिस ठाण्यात जावून घडलेला प्रकार सांगितला. यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.