Mumbai Mira Road News । वाहतूक पोलिसाला रस्त्यावर ‘वर्दी उतरव’ म्हणाऱ्याला खाकी वर्दीचा दणका, अटकेनंतर रडला ढसाढसा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Mira Road News । मुंबईतील मीरारोड (Mumbai Mira Road) येथील रस्त्या कडेला ‘नो पार्किंग’मध्ये (‘No parking) उभ्या केलेल्या गाडीला वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायाने जॅमर (Jammer) लावले. यावरून गाडीच्या मालकांनी येऊन वाहतूक पोलिसाला (Traffic police) ‘थेट वर्दी उतरव, चिरून टाकेन’ आणि पोलिसांना विकून गाडी दुरुस्त करू अशी धमकी देत गदारोळ घालणाऱ्या पती पत्नीस पोलिसांनी वर्दीचा चांगलाच इंगा दाखवला आहे. त्या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसाला धमकी देणं चांगलंच महागात पडलं आहे. त्या दाम्पत्याचा ढसाढसा रडत्याला फोटो देखील व्हायरल झाला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, अरुण रतन सिंग (वय, 36) आणि त्याची पत्नी मीना (वय, 33) (रा. साई अंगण, रामदेव पार्क, मीरारोड) अशी अटक केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. ही घटना गुरुवारी दुपारच्या दरम्यान घडली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई कृष्णत दबडे (Police constable Krishnat Dabde) हे नो पार्किंग मधील गाड्यांवर कारवाई करत होते. दुपारी अडीजच्या सुमारास मीरारोड जवळील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य रस्त्यावर ‘नो पार्किंग’ (‘No parking) त्रात मोटार उभी केली होती. त्या ठिकाणी वाहन चालक दिसून न आल्याने त्यांनी जॅमर लावला. तेव्हा तेथील एका दुकानातून अरुण (Arun) आणि त्याची पत्नी मीना (Mina) हे दोघे बाहेर आले. गाडीला जॅमर लावल्याचे पाहून दोघेही पोलिसावर तुटून पडले. वाट्टेल तश्या धमक्या, शिवीगाळ, आणि पैशांची मस्ती दाखवून गोंधळ घालू लागले.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

त्यावेळी, ‘तुझी वर्दी उतरव मग बघा तुला कसा चिरून टाकतो असं अरुण सिंगने धमकी दिली.
नंतर त्याच्या पत्नीने म्हटलं की, ‘तुला विकून गाडी दुरुस्त करेन अशी दमदाटी वाहतूक पोलिसाला केली गेली.
रस्त्यावर जमावाने गर्दी केली होती.
शेवटी नया नगरचे पोलिसांनी (Naya Nagar Police Station) घटनस्थळी धाव घेतली तेव्हा दोघांना अटक करण्यात आले.
वाहतूक पोलीस दबडे यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी त्या दोघा दाम्पत्यास ताब्यात घेतले.
दरम्यान अटक केल्यानंतर अरुण ढसाढसा रडू लागला त्यांनतर त्या दोघांनी पोलिसाना विनंती करत माफी मागितली.
पुन्हा आम्ही असं करणार नाही असं पोलिसाना त्यांनी सांगितलं.

Web Titel :- Mumbai Mira Road News । mumbai mira road man who threatens police constable road starts crying after arrest

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हला काही नको’, तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम