बीएमसी मधील पत्रकार कक्षाला कुलूप, मनसेचा राडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
मुंबई महापालिकेतील पत्रकार कक्षात आज मनसेची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला परवानगी नाकारल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पत्रकार कक्षाला कुलूप लावल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी जनसंपर्क कक्षात धडक मारुन जाब विचारला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a81f481b-cd50-11e8-b250-2de728a13d22′]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , बीएमसीमधील या पत्रकार कक्षेत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे महापालिकेच्या एका आरक्षित भूखंडाबाबत पत्रकार परिषद घेणार होते. मात्र इथे पत्रकार परिषदेला परवानगी नसल्याचं कारण देत जनसंपर्क विभागाने या कक्षाला कुलूप लावलं. तसंच महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B01M0W1MLY,B06XX2W376,B06X9VTL5C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b63c1a58-cd50-11e8-ba19-837b30292e09′]

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या संदीप देशपांडे यांनी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय खबाळे यांच्या कक्षात धडक मारत जाब विचारला. दरम्यान, यासर्व प्रकारामागे शिवसेना असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.
शिवसेना आम्हाला घाबरली
आजपर्यंत शिवसेनेला इतरांच्या पत्रकार परिषदा उधळताना बघितलं होतं, स्वत:च्या पत्रकार परिषदा गाजवताना बघितलं होतं, पण आज पहिल्यांदा शिवसेनेला कुणाच्यातरी पत्रकार परिषदेमुळे घाबरलेलं बघितलं. शिवसेना आम्हाला घाबरली कारण, त्यांच्या मनातच काळबेरं आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीच जनसंपर्क विभागाला मनसेची पत्रकार परिषद रोखण्यास सांगितलं आणि पत्रकार कक्षालाच टाळं लावलं, अशा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

दादरमधील शिवाजी पार्कच्या जिमखान्याच्या जागेवर नवा महापौर बंगला बांधण्याचा विचार सुरु आहे. इथे दहा हजार महापालिका कर्मचारी व्यायामशाळेत येतात आणि इतर मैदानी आणि बैठे खेळ खेळतात. इथे महापौर बंगला झाला तर मनसेचा विरोध राहिल…बंगल्याची एकही विट इथे रचू देणार नाही… असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. महापौर बंगल्याचा विषय आज पत्रकार परिषदेत होता, म्हणूनच शिवसेना घाबरली आणि माझी पत्रकार परिषद रोखली, असाही दावा देशपांडेंनी केला.