मुंबई महापालिकेची निवडणूक ‘महाविकास’ एकत्र लढणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेवरुन चांगलात आखाडा रंगला होता, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात विरोधकांनी यश आले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकासआघाडी करत भाजपला राज्यात सत्तास्थापनेपासून दूर ढकलले. यामुळे भाजपचा तिळपापड झाला. निवडणूकीत सर्वात मोठा पक्ष ठरुन देखील भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. त्यामुळे आता हा महाविकासआघाडीचा फॉर्म्यूला पुन्हा एका महापालिकेत दिसेल, याचे संकेत खुद्द शरद पवारांनी दिले आहेत

राज्यात भाजपला रोखल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपला रोखण्याचे आव्हान असा महाविकासआघाडीसमोर आहे. यासाठी महाविकासआघाडीचे फॉर्म्युल्यावर काम सुरु असून मुंबई महापालिकेत महाविकासआघाडी आता पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.

राज्यात आता अनेक महानगरपालिकेच्या निवडणूका सुरु होतील. यासाठी महाविकासआघाडीने महापालिकेत देखील भाजपचे कमळ न फुलवता आपला झेंडा कसा फडकवता येईल यासाठी काम सुरु केले आहे. असे असले तरी भाजपकडून मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी मास्टरप्लॅन तयार केला आहे. भाजपच्या नेत्यांकडून मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार असे दावे करण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठीची फिल्डिंग भाजपने लावण्यास सुरुवात केली आहे.

सध्या मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी ही महापालिका अत्यंत प्रतिष्ठेची आहे, शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेत बसवण्यात शिवसेनेला यश आले. मुंबई महापालिकेवर नुकतीच महापौर म्हणून किशोरी पेडणेकर यांची निवड झाली आहे, त्यामुळे महापौरांबरोबर महापालिका देखील शिवसेना राखण्याच्या प्रयत्नात आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/