धक्कादायक ! ‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या उत्पन्नात 41 टक्क्यांची घट

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचे उत्पन्न कोरोनामुळे पहिल्या सहा महिन्यांतच 41 टक्क्यांची घटले आहे. त्यामुळे खर्च भागवण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्याचा विचार पालिका करीत आहे.

फेब्रुवारी महिन्यात पालिकेचा 2020-21 या आर्थिक वर्षांचा 33 हजार 441 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र त्यानंतर महिन्याभरातच मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आणि देशभरात लॉकडाउन करण्यात आले. एप्रिलपासून नवीन अर्थसंकल्प लागू होण्याच्या आधीच संपूर्ण व्यवहार ठप्प झाल्याने गेल्या आर्थिक वर्षांतील कर आणि शुल्कांची वसुलीही पूर्ण होऊ शकली नाही. नवीन आर्थिक वर्षांत तर उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाला. चालू आर्थिक वर्षांत पालिकेला 28,448.30 कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. जकातीपोटी नुकसान भरपाई, मालमत्ता कर, विकास नियोजन शुल्क व अधिमूल्य, गुंतवणूकीवरील व्याज, राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान अशा विविध मार्गाने हे उत्पन्न येत असते. त्यापैकी पहिल्या सहा महिन्यात 8,320 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. मात्र अद्याप केवळ 4,905 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर आतापर्यंत करोनाच्या व्यवस्थापनासाठी व अन्य गोष्टींसाठी 3,809 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like