‘म्यूझिक’ टिचरनं केलं 3 वर्षाच्या विद्यार्थीनीचे ‘लैंगिक’ शोषण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र पोलिसांनी 55 वर्षीय एका गिटार शिकवणाऱ्या शिक्षकाला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीवर एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा कथित आरोप आहे. भारत पंचाल नावाचा हा व्यक्ती तीन वर्ष या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अंधेरीतील एका घरी संगीताचा क्लास घेण्यासाठी जात होता, त्याने 2007 पासून 2010 पर्यंत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. परंतु हा प्रकार आता समोर आला.

जेव्हा अल्पवयीन मुलगी 12 वर्षांची होती तेव्हा तिच्या आई वडीलांनी तिला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले. त्यानंतर तिची मानसिक स्थिती खराब झाली. कुटूंबीयांनी जेव्हा तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला होता.

पीडित तरुणी अमेरिकेतील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते, रविवारी ती मुंबईत आली, यानंतर पीडितेने भारत पंचाल विरोधात पोलिसात एफआयआर दाखल केली. ज्यानंतर ओशिवारा पोलिसांनी या संगीत शिक्षकाला ताब्यात घेतले. तरुणीने पोलिसांना सांगितले की म्यूझिक क्लासवेळी आरोपी तिचे लैंगिक शोषण करत होता आणि तिच्याशी बोलताना अश्लील भाषेचा वापर करायचा.

ओशिवारा पोलिसांच्या मते ही घटना जुनी आहे. या प्रकरणात मुलीची आई तक्रारदार आहे. सोमवारी आरोपीला अंधेरी मॅजिस्टेट न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस म्हणाले की आम्ही याचा तपास घेत आहेत की आरोपींने इतर विद्यार्थीनींचे देखील लैंगिक शोषण तर केलेले नाही.

You might also like