नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Nashik Highway Accident | मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai-Nashik Highway) नाशिक ग्रामीण पोलिसांच्या (Nashik Rural Police) व्हॅनला अपघात (Police Van Accident) झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने पोलिसांची व्हॅन पलटी झाली. या अपघातात एक जण गंभीर जखमी (Seriously Injured) झाला आहे. तर दहाजण किरकोळ जखमी (Minor Injuries) झाले आहेत. जखमी झालेल्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात (Government Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Mumbai Nashik Highway Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून मुंबईच्या (Mumbai) दिशेने जात असताना पोलिसांच्या व्हॅनचा अपघात झाला. माणिक खांब शिवारातील वळणावर नाशिक ग्रामीण पोलिसांची व्हॅन अचानक पलटी झाली. व्हॅन चालकाचा ताबा सुटल्याने व्हॅन पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी तर 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
जखमी झालेल्यांना पुढील उपचारासाठी घोटी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत (Traffic Jam) झाली होती. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Web Title :- Nashik rural police van overturned on mumbai nashik highway 1 seriously injured and 10 injured
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Price Today-MCX Market India | सोन्याचा भाव 53 हजारच्या जवळ; पाहा कसं महागलं सोनं