Coronavirus : महाराष्ट्रातील वाशीमध्ये ‘कोरोना’मुळं 65 वर्षीय महिलेचा मृत्यू, राज्यातील मृतांचा आकडा 4 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये कोनोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे. वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात 65 वर्षीय महिलेच्या मृत्यू कोनामुळे झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची सख्या 4 वर पोहचली आहे. तर आज कोरोनाचे पुन्हा दोन रुग्ण आढळून आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 24 मार्चला या महिलेचा मृत्यू झाला होता. आज शवविच्छेदन अहवाल हाती आला असून हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे समोर आले आहे. मृत महिला ही उपचारासाठी वाशीमधील 2 खासगी रुग्णालयात गेली होती. अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान ठाणे आणि पनवेलमध्ये एक-एक रुग्ण आढळून आले आहेत.

पनवेल आणि ठाण्यात आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 124 वर पोहचला असल्याने, नागरिकांनी घरातच बसावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

You might also like