Mumbai NCB | मुंबई एनसीबीची नांदेडमध्ये मोठी कारवाई ! 4 कोटींचा गांजा जप्त

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबई एनसबीच्या (Mumbai NCB) पथकाने नांदेड जिल्ह्यात सोमवारी (दि.15) पहाटे मोठी कारवाई केली आहे. नांदेड जिल्ह्यातील (Nanded district) नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथे एका ट्रकमधून (MH26 AD 2165) 35 गोण्यांतील तब्बल 4 कोटींचा गांजा (Marijuana Smuggling) जप्त केला आहे. विशाखापट्टणम येथून राज्यात विक्रीसाठी हा गांजा आणण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई एनसीबीच्या (Mumbai NCB) पथकाची पुढील कारवाई सुरु आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गांजाची वाहतूक होत
असल्याची माहिती मुंबई एनसीबीच्या (Mumbai NCB) पथकाला मिळाली होती.
या माहितीवरुन एनसीब पथकाने आज पहाटे मांजरम येथे सापळा लावला.
ग्रामस्थ, स्थानिक पोलीस आदींच्या मदतीने पथकाने एक ट्रक अडवला.
ट्रकची तपासणी केली असता 35 गोण्यांमध्ये तब्बल 4 कोटींचा गांजा आढळून आला.

 

ही कारवाई एनसीबीचे अधिकारी अमोल मोरे (NCB officer Amol More), सुधाकर शिंदे, संजय गवळी, प्रमोद मोरे, कृष्णा पारमदरेकर यांनी.
तर पथकास गजाजन पाटील, सरपंच श्रीकांत नीळकंठ मांजरमकर, पोलीस पाटील जयराज पाटील शिंदे, वसंत शिंदे, इंद्रजीत पटवे, बापूराव पटवे यांच्यासह मांजरम ग्रामस्थांनी मदत केली.

 

जळगामध्ये 1500 किलो गांजा जप्त

 

मुंबई एनसीबीच्या पथकाने आज पहाटे जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) एरंडोल येथे 1500 किलो गांजा जप्त केला आहे.
पथकाला खबऱ्याकडून टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी ट्रकमधून वाहतूक करण्यात येत असलेला गांजा पकडला आहे.
याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 1500 किलोचा गांजा जप्त केला आहे.
आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता.
विशेष म्हणजे, राज्यात विक्रीसाठी नांदेड येथील गांजा सुद्धा विशाखापट्टणम येथूनच आणण्यात आला होता.

 

1.1 टन गांजा जप्त – समीर वानखेडे

 

या कारवाई प्रकरणी मुंबई एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी सांगितले की, मुंबई एनसीबीने आज मोठी कारवाई केली आहे.
1.1 टन गांजा जप्त करुन दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पुरवठा करणारे आणि गांजा पुरवणारे यांचा शोध घेतला जात आहे.
गांजा आंध्र प्रदेशातून (Andhra Pradesh) आला होता.
हा गांजा राज्यातील विविध शहरांत पाठवला जाणार होता.
मुंबई एनसीबीने (Mumbai NCB) आज पर्यंत केलेल्या कारवाईतील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

 

Web Title : Mumbai NCB | mumbai ncbs action nanded 4 crore cannabis seized 35 bags sameer wankhede

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Vikram Gokhale | ‘शाहरुख आणि आर्यन खान माझे काहीही वाकडं करू शकणार नाहीत’

Yashomati Thakur | ‘विक्रम जी, आपल्या वयाचा आदर… ‘, यशोमती ठाकूर यांनी साधला विक्रम गोखलेंवर निशाणा

IEPFA | सरकारच्या ‘या’ निर्णयाने कोट्यवधी गुंतवणुकदारांना फायदा! आता जुन्या गुंतवणुकीवर क्लेम करणे होईल सोपे