महाराष्ट्राचं ‘महाभारत’ ! ‘मुख्यमंत्री’ शिवसेनेचाच फक्त ‘मंत्री’ पदाबाबत चर्चा बाकी, आघाडीतील ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाविषयी आक्षेप नाही. संभाव्य कॅबिनेट मंत्र्याबाबत अद्याप चर्चा झाली नाही. तथापि, यावर समन्वय समिती ने चर्चा करण्याचे मान्य केले आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचे सांगितले होते.

कॉंग्रेसने सरकारमध्ये जाण्याचे मान्य केले –

नवाब मलिक म्हणाले की, ‘आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सातत्याने काम करत आहोत. यामध्ये शेतकरी, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि तरूण या विषयांवर चर्चा झाली आहे.’
यापूर्वी कॉंग्रेस बाहेरून राष्ट्रवादी-शिवसेना सरकारला पाठिंबा देण्याविषयी विचार करत होती, पण शरद पवारांनी समजावल्यानंतर कॉंग्रेस सरकारमध्ये येण्यास राजी झाली आहे असा दावा मलिक यांनी केला.

कोणीही सरकार स्थापनेचा दावा केला नाही –

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सत्तेत समान वाटपासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरूच आहे. दोन्ही पक्ष सरकार स्थापन करू शकले नाहीत. विधानसभेची मुदत संपेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. राज्यपालांनी सर्व पक्षांना सरकार स्थापनेची संधी दिली, परंतु बहुमत नसल्याचे सांगत सर्व पक्षांनी सरकार स्थापन करण्यास नकार दिला.

राष्ट्रपती राजवट लागू

भाजपाने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिलं. मात्र त्यांना हा दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राज्यपालांनी यांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं.राज्यात सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम असतानाच राष्ट्रवादीने आमच्याकडे बहुमताचे आकडे नाहीत असे सांगितल्यानंतर अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like