Mumbai NCP | नवाब मलिक यांच्यावरील ED च्या कारवाई नंतर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार राखी जाधव यांच्याकडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai NCP | मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक (NCP Meeting in Mumbai) पार पडली. यामध्ये मुंबईतील नगरसेवक राखी जाधव (Corporator Rakhi Jadhav) यांच्याकडे मुंबईच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. नवाब मलिक  (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर मुंबईच्या अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार (Additional charge Mumbai NCP President) दुसऱ्याकडे सोपवला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. यामध्ये मुंबई अध्यक्षपदावर (Mumbai NCP) राखी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

 

 

नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही यावरती राष्ट्रवादीच्या नेत्यांची ठाम भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Mumbai NCP) नगरसेविका राखी जाधव देखील या बैठकीत उपस्थित होत्या. आगामी मुंबई महापालिका निवडणुका (Brihanmumbai Municipal Corporation Election) डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने हा मोठा निर्णय घेतला आहे.

 

राष्ट्रवादीच्या बैठकीत नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या गोंदिया (Gondia) आणि परभणी (Parbhani) जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची (Guardian Minister) जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवण्यात बाबत चर्चा झाली.
धनंजय मुंडे यांच्याकडे परभणी तर प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्याकडे गोंदियाचा कार्यभार दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल (Praful Patel),
दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), धनंजय मुंडे (Dhananjay Munde),
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) बैठकीत हजर होते.

 

 

Web Title :- Mumbai NCP | rakhi jadhav holds the additional post of ncp mumbai president sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 229 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Holi Precautions | होळी खेळताना ‘या’ 7 चुका करू नका नाहीतर…

 

Gauahar Khan On The Kashmir Files | अभिनेत्री गौहर खानने ‘द काश्मिर फाइल्स’वर केली ‘हे’ वक्तव्य, म्हणाली…

 

Anti Corruption Bureau (ACB) Aurangabad | बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडे सापडले कोट्यवधींचं घबाड! ACB चे अधिकारीही चक्रावले

 

Amol Mitkari | ‘छत्रपतींनी करून ठेवलेल्या ‘त्या’ गोष्टींमुळे पोर्तुगीजांना…”; इतिहासाचा दाखला देत मिटकरींचं भाजपवर टीकास्त्र

 

Credit Cards And Grocery Bills | ग्रोसरी बिल करायचे असेल कमी, तर ‘या’ 6 क्रेडिट कार्डद्वारे मिळेल शानदार कॅशबॅक आणि डिस्काऊंट