Mumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी नियमावली जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागान साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ब्रेक द चेनचे (Break the chain) आदेश नवीन नियम जारी केले आहेत. यानंतर आता मुंबईतील नवीन नियामांसंदर्भात (Mumbai New Regulations) निर्णय झाला आहे. मुंबईतील नवीन नियमांनुसार (Mumbai New Regulations) मुंबईतील सर्व दुकाने आता रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तर हॉटेल दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली. ब्रेक द चेन अंतर्गत मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) सुधारित नियमावली जाहीर केली. त्यामुळे निर्बंधांच्या शिथिलतेबाबत मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तसेच, मेडिकल व केमिस्ट दुकाने (Medical and chemist shops) आठवड्यातील सर्व दिवस 24 तास सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. तर जलतरण तलाव (Swimming pool) आणि निकट संपर्क येऊ शकतो असे क्रीडा प्रकार वगळ्यात आले आहेत. मात्र अन्य इनडोअर व आउटडोअर खेळांना आठवड्याचे सर्व दिवस नियमित वेळेनुसार परवानगी दिली आहे. चित्रीकरण नियमित वेळेनुसार करण्यास परवानगी दिली आहे.

दरम्यान राज्यातील 25 जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मात्र, उर्वरित 11 जिल्ह्यात स्तर  3 चे निर्बंध असणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केलं आहे.
आताच्या नव्या नियमावलीनुसार (New regulations) सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत.
या अनलॉकच्या (Unlock) नव्या निर्णयाकडे राज्यातील नागरिकांचं आणि  व्यापाऱ्याचं अधिक लक्ष लागलेलं होतं.
यामुळे राज्यभरातील जवळपास 25  जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे.
मात्र, राज्यातील अधिक रुग्ण संख्यांचा प्रमाण असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये स्तर 3 चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत.

Web Title :- Mumbai New Regulations | all shops in mumbai will remain open till 10 pm new regulations announced

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य असल्याचे सिद्ध करणारे पुरावे

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 4,869 नवीन रुग्ण, तर 8,429 जणांना डिस्चार्ज

Pune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला आंबेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प पुन्हा सुरू होणार?