आदित्य ठाकरे हा तर नवा ‘पप्पू’ , ‘या’ महिला नेत्यानी केली टीका

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – आम आदमी पार्टीच्या (आप) प्रीती मेनन यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, एक ट्विट केले आहे. यात त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीकेची झोड उठवत त्यांना पप्पू म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांच्या ‘आरे बचाव’ या मोहिमेचा धागा पकडत प्रीती मेनन यांनी त्यांच्यावर तोफ डागली आहे.

आदित्य ठाकरेंनी “शिवसेनेचा विरोध मेट्रोला नाही तर ,आरे मध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रास्ताविक कारशेडला विरोध आहे, या मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड करण्यात येणार आहे आणि ते शिवसेनेला मान्य नाही ” असं विधान १० सप्टेंबरला केलं होतं. मात्र आता आदित्य ठाकरे यांनी आरेबाबत मांडलेली भूमिका आणि कृती यामध्ये फरक आहे त्याचा परस्परसंबंध नाही असे म्हणत प्रीती मेनन यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. आरे बचाव मोहिमेबाबत वापरलेल्या शब्दांचा आणि कृतींचा परस्पर संबंध नाही म्हणत #papputhackery हा हॅशटॅग ट्रेंड करून आदित्य ठाकरे म्हणजे नवा पप्पू आहेत असे म्हटले आहे.

@terence_fdes या अकाऊंटवरुन आरे बचाव संदर्भातलं ट्विट करण्यात आलं आहे. ते रिट्विट करताना त्याला दिलेल्या उत्तरात आपच्या प्रीती मेनन यांनी आदित्य ठाकरेंना पप्पू ठाकरे असं संबोधलं आहे.

सामान्यतः राहुल गांधी यांना भाजप नेते पप्पू असं संबोधन वापरतात तेच संबोधन आदित्य ठाकरे यांच्यासोबत वापरल्याने शिवसेनेत संतापाची लाट पसरली असावी, पण याबाबत शिवसेनेनं अजून काही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधीही प्रकाश आंबेडकरांनी शिवसेना प्रमुखांना आदित्य ठाकरेंना पप्पू होऊ देऊ नका असे सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांची तुलना राहुल यांच्याशी झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

You might also like