Nawab Malik-Nitesh Rane | नितेश राणे आणि नवाब मलिक यांच्यात खंडाजंगी ! फोटो मॉर्फ करुन परस्परांवर जोरदार टीकास्त्र

mumbai news bjp leader nitesh rane and ncp leader nawab malik twitter war morph photo
File photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nawab Malik-Nitesh Rane | गेली दोन दिवस झाले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) सुरु आहे. यादरम्यान सत्ताधारी आघाडी सरकार आणि विरोधकांत अनेक विषयावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे दिसले. दरम्यान विधिमंडळाच्या बाहेर भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना ‘म्याव-म्याव’ म्हणत डिवचलं. यानंतर शिवसेना आणि राणे यांच्यात पुन्हा आरोपांच्या फैरी झडल्या. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मलिकांच्या प्रतिक्रियेनंतर नितेश राणेंनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. (Nitesh Rane and Nawab Malik)

नवाब मलिकांनी मांजर आणि कोंबडीचा फोटो मॉर्फ करुन ट्विटरवर शेअर केला होता. मलिक यांच्या टीकेचा रोख नितेश राणे (Nitesh Rane and Nawab Malik) यांच्या दिशेने होता. यानंतर नितेश राणे यांनी ट्विटरवर एका डुकराचा फोटो शेअर केला. त्यामध्ये नवाब मलिक यांचा चेहरा मॉर्फ करण्यात आला होता. ‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते.. ओळखा पाहू कोण?,’ असं शीर्षक देखील त्याबरोबर देण्यात आले होते. या उत्तर प्रत्युत्तरामध्ये नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासूनच सत्ताधारी आणि विरोधकात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. दरम्यान, भाजप नेते, आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. त्याचवेळी आदित्य ठाकरे हे सभागृहात जात होते. तेव्हा नितेश राणे यांनी त्यांची खिल्ली उडवण्यासाठी ‘म्याव-म्याव’ आवाज काढला. याच प्रकारामुळे शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार संतापले होते. परंतु, त्यानंतरही नितेश राणे यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले. ‘शिवसेना ही पूर्वी वाघ होती, आता तिची मांजर झाली आहे. त्यामुळे मी केले त्यामध्ये काहीही गैर नाही.’ अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली होती.

दरम्यान, ‘विधिमंडळाच्या आवारात निदर्शने करताना एका आमदाराने एका तरुण मंत्र्यांला हिणवण्यासाठी असभ्यपणे आवाज काढल्याचा व असे प्रकार रोखण्याची गरज असल्याचे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी सभागृहात म्हटले.
यानंतर अशा पद्धतीने नक्कल व आवाज काढणे चुकीचे असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले आहे.
कोणाचीही मानहानी होणार नाही याची सर्वांनीच खबरदारी घेतली पाहिजे, असं देखील फडणवीस यांनी म्हटलं होतं.

Web Title  : mumbai news bjp leader nitesh rane and ncp leader nawab malik twitter war morph photo

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts