कामाची गोष्ट ! रेशनिंगबद्दल तक्रार आहे ? तर मग ‘या’ क्रमांकांवर संपर्क साधा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनच्या कालावधीत गरिबांसाठी स्वस्त धान्य पुरवठा केला जात आहे. त्यात आता राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागानं केलेल्या आवाहनानुसार आपल्याला रेशनिंग संदर्भातील कोणतीही तक्रार असल्यास किंवा माहिती मिळवायची असल्यास १८००२२४९५० किंवा १९६७ या नि:शुल्क हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करू शकता.

माहितीनुसार, या लॉकडाऊनच्या कालावधीत रेशनिंग दुकानात स्वस्त अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासोबतच त्या मिळवण्यात अडचणी येऊ नये, याबाबत सरकार खबरदारी घेत आहे. त्या हेतूसाठीच ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. रेशनिंगसाठीच्या तक्रारीसाठी/रेशनिंगची माहिती मिळविण्यासाठी दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करून किंवा ईमेल वा ऑनलाईन तक्रार देखील करू शकता, असे आवाहन जनतेला करण्यात आलं आहे.

१८००२२४९५०/१९६७ (नि:शुल्क) ही राज्यस्तरीय हेल्पलाईन सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यासोबतच ०२२-२३७२०५८२ / २३७२२९७० / २३७२२४८३ हे अन्य हेल्पलाइन क्रमांक देण्यात आलेले आहेत. तसेच ईमेल- [email protected], व ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी mahafood.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली याचा वापर करू शकता. तसेच मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. हे कक्ष सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहील. त्यासाठी ०२२-२२८५२८१४ हा हेल्पलाईन क्रमांक, आणि [email protected] हा ईमेल उपलब्ध करून देण्यात आला आहे.