‘धारावी मॉडेल’चे श्रेय लाटणे ही तर निलाजरी प्रवृत्ती, शिवसेनेचा भाजपवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – धारावी मॉडेलच्या यशाचे श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती आहे. धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्यक्ष कोणी किती मेहनत घेतली?, याची साक्ष धारावीतील जनताच देईल. मोठेपणा हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. उगीच नको त्या विषयात राजकारण करून जनतेच्या भावनांचा अनादर करणे, विरोधकांना महागात पडेल, असा इशारा देत राहुल शेवाळे यांनी भाजपवर निशाणा साधला.

मुंबईमधील धारावीत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला आलेल्या यशाचं जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले. मात्र, यावरून आता धारावीच्या श्रेयवादावरून भाजप-शिवसेनेत जुंपली आहे. धारावीचे श्रेय केवळ सरकारचं नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनीही धारावीत जीव धोक्यात घालून काम केले आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. याला चोख प्रतिउत्तर शिवसेनेचे हे.राहुल शेवाळे यांनी दिले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने धारावीत कोरोना साखळी तोडण्यात सरकारला आलेल्या यशाचं कौतुक केले आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धारावीत सरकारच्या कामाचे कौतुक आहे. मात्र, सरकारच्या कामाने धारावीतील करोना नियंत्रणात आला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जीव धोक्यात घालून स्क्रिनिंग केले म्हणून आला.

स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक सदस्याची तापमान, ऑक्सिजन, सॅच्युरेशन तपासणी केली. जे संशयास्पद वाटलं ते महानगरपालिकेला सांगितले. त्यांनी हे काम पालिकेच्या मदतीने केले. त्यामुळे सर्व श्रेय सरकारचं असण्याचे काहीच कारण नाही, असेही पाटील म्हणाले.

मुंबईत करोना नियंत्रणात आला तर आम्हाला आनंद आहे. मात्र, करोनावर नियंत्रण आणलं म्हणून भ्रष्टाचारावर बोलायचं नाही का? करोनाच्या कामाचे अभिनंदन करताना मागे जो भ्रष्टाचार झाला त्याचेही विषय काढू, असा चिमटा देखील चंद्रकांत पाटील यांनी काढला. तर, पाटील यांच्या टीकेला शिवसेनेतून शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like