Mumbai News : लोकलबाबत सर्वसामान्यांना आणखी प्रतिक्षाच

मुंबई : मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेने मुंबईकरांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. लॉकडाऊन होण्यापूर्वी जेवढ्या लोकल धावत होत्या. तितक्याच लोकल आता २९ जानेवारीपासून सुरु होणार आहे. मात्र, अजूनही लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

मध्ये रेल्वेने २९ जानेवारीपासून १५८० ऐवजी १६८५ लोकल फेर्‍या करण्याचा निर्णय घेतला आहे़ तर पश्चिम रेल्वेने १२०१ ऐवजी १३०० पर्यंत लोकल फेर्‍या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अजूनही लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. ही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाच लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांसाठी लोकल लवकरच सुरु करण्याचे सुतोवाच केले होते.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. काल ३४६ नवीन रुग्ण आढळून आले होते. ही गेल्या ८ महिन्यांमधील सर्वात कमी संख्या आहे. त्याचवेळी मुंबईतील जनजीवन सर्वसामान्य झाले आहे. त्यामुळे लोकांना आपापल्या कामाच्या ठिकाणी जाण्यास खुप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु होईल अशी अपेक्षा मुंबईकर व्यक्त करीत आहेत.