Mumbai News | मुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात सिंकहोलमध्ये गेली (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या घाटकोपरमध्ये (Mumbai Ghatkopar) एका रहिवाशी भागात पार्किंगमध्ये (Parking) उभी असलेली कार (Car) काही सेकंदात एका सिंकहोलमध्ये (Sinkhole) बुडाली. त्या भागात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस (rain) होत होता. या विचित्र घटनेचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर वायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कारचे बोनेट आणि समोरची चाके अगोदर सिंकहोलमध्ये (Sinkhole) बुडताना दिसत आहे. यानंतर कारचा मागील भाग सुद्धा त्यामध्ये जातो. अशाप्रकारे संपूर्ण कार सिंकहोलमध्ये जाते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update


हैराण करणारी ही घटना घाटकोपरमध्ये त्रिभुवन मिठाईवालाच्या पाठीमागे रामनिवास हौसिंग सोसायटीमधील आहे. व्हिडिओ वायरल झाल्यानंतर बीएमसीने प्रेस नोटद्वारे स्पष्टीकरण दिले आहे की, या घटनेशी बीएमसीशी काहीही संबंध नाही कारण ती जमीन सोसायटीची होती आणि विहिरीला आरसीसीद्वारे अर्धी झाकून परिसरात पार्किंगसाठी वापरले जात होते, जे बांधकाम आता ढासळले आहे आणि तिथे पार्क केलेली कार आत बुडाली.

ही कार पंकज मेहता (Pankaj Mehta) नावाच्या व्यक्तीची आहे. घटना घडली तेव्हा कारमध्ये कुणीही नव्हते. बीएमसी (BMC) आणि पोलिसांनी (Police) कार बाहेर काढली. या कारच्या शेजारी असलेल्या इतर गाड्यांवर मात्र कोणताही परिणाम झाला नाही.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) आठवड्याच्या शेवटी शहरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
आयएमडीने शनिवारी सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केला होता.

Wab Title :- mumbai news | video of bizarre incident in mumbais ghatkopar shows whole car disappearing into sinkhole within seconds

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement

येथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free

Coronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त मृत्यू? सरकारने मॅग्झीनचा दावा फेटाळला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा