Mumbai News : 29 वर्षीय डॉक्टर तरुणीची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइऩ – अभ्यासाच्या तणावातून एका 29 वर्षीय डॉक्टर तरुणीने (young doctor) इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या केली आहे. मुंबईतील  वरळी येथे गुरुवारी (दि. 3) दुपारी ही धक्कादायक घटना घडली. आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईल की नाही, या तणावात तिने हे टाेकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज असून, पाेलीस अधिक तपास करत आहेत.

Aadhaar Card for Children : लहान मुलांसाठी आधार कार्ड बनवण्यासाठी ‘ही’ कागदपत्रे अत्यावश्यक, जाणून घ्या

डॉ. निताशा बंगाली (young doctor) (वय 29, रा समु्द्र दर्शन इमारत, वरळी, मुंबई ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

COVID-19 in India : कोरोनाचा वेग आणखी मंदावला; 24 तासात 1.20 लाख केस, 3380 रूग्णांचा मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, वरळीतील समुद्र दर्शन इमारतीत निताशा ही आई-वडील व भावासोबत राहत होती. तिचे आई, भाऊ, मावशी डॉक्टर आहेत तर वडील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. निताशा केईएममध्ये पदव्युत्तरच्या तृतीय वर्षाला होती. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता ती रुग्णालयातून घरी आली. त्यानंतर तिने भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेतला. संध्याकाळी तिची आई जेंव्हा घरी आली त्यावेळी निताशा बेशुध्दावस्थेत होती. तिला तत्काळ नायर रुग्णालयात दाखल केले.

कोल्हापूर, सांगली, सातारासह 10 जिल्ह्यांचा तिसर्‍या टप्प्यात समावेश, ‘या’ पध्दतीची असणार नियमावली, जाणून घ्या

मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गेल्या काही महिन्यांपासून आपण तृतीय वर्षात उत्तीर्ण हाेणार की नाही? नापास झाले तर मित्र-मैत्रिणींना, कुटुंबाला कसे तोंड देणार, अशा अनेक विचारांमुळे ती तणावात होती. तिने आत्महत्येचा विचार येत असल्याचे तिने आईला सांगितले हाेते. त्यावेळी आईने तिची समजूत देखील काढली होती. पण अखेर निताशाने तणावातून टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली आहे.

Maharashtra Unlock : नव्या नियमावलीनुसार E-Pass संदर्भातही मोठे बदल, जाणून घ्या

 

READ ALSO THIS :

 

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

 

मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या