‘नाईट लाईफ’ म्हणजे केवळ ‘दारु’ पिणं, भाजपाच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाचे राज पुरोहित यांनी नाईटलाईफमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात येईल असं मत व्यक्त केलं आहे. तसेच निर्भया सारख्या घटना या दारु पिऊनच होत असतात. त्यामुळे नाईट लाईफचा मी दहा वर्षापासून विरोधच करत आलोय. पाच वर्षापूर्वी देखील मुंबई पोलिसांनी सुरक्षेचा मुद्दा समोर ठेऊन नाईटलाईफला विरोध दर्शविला होता. परंतु आज अचानक परिस्थिती बदलली आणि तेच पोलीस आज नाईटलाईफ ला परवानगी देत आहेत, असा सवाल राज पुरोहित यांनी उपस्थित केला आहे.

नाईटलाईफ चा मुद्दा जेव्हा पुढे आला होता त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माझ्या विरोधाचे समर्थन केलं होतं. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संस्कृतीचे समर्थन करणार नाहीत. असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

‘नाईटलाईफ म्हणजे केवळ दारू पिणे’
राज पुरोहित म्हणाले की नाईटलाईफ मध्ये अधिकृतरीत्या नाही तर चोरून दारू विकली जाईल. जर तुम्हाला रोजगाराला आणि व्यवसायाला चालना द्यायची असेल तर सरळ सरळ कारखाने उभारावे असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच ते म्हणाले की आपली संस्कृती रामकृष्णाची आहे, संत कबीरांची आहे, रात्री दारू पिणाऱ्यांची नाही. तसेच ते पुढे जाऊन म्हणाले की एक सुजाण मुंबईकर म्हणून मी सदैव या नाईटलाईफचा विरोधच करणार आहे. बाकी पक्षाची भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मांडतीलच.

‘हॉटेल व्यावसायिकांचा नाराजीचा सूर’
हॉटेल व्यावसायिक या निर्णयाने खुश नाहीत. कारण त्यांच्यामते या निर्णयाने मॉल्स मधील हॉटेल त्यांच्या मनाप्रमाणे दर आकारातील याची भीती तर आहेच परंतु विशेष म्हणजे त्यांचीच मक्तेदारी होईल, असाही एक सूर हॉटेल व्यावसायिकांचा आहे. तसेही जे पर्यटक मॉल पर्यंत पोहोचणार नाहीत अशांसाठी तरी रेल्वे स्टेशन बाहेरचे हॉटेल खुले ठेवण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुंबईतीमधील प्रमुख रेल्वे स्टेशन म्हणजेच सिएसएमटी, दादर, बांद्रा, कुर्ला अशा काही प्रमुख रेल्वे स्टेशन बाहेरील हॉटेल खुली ठेवावी. ज्यामुळे आंतरराज्यीय पर्यटकांना खाण्यासाठी कुठे भटकायला नको, कारण अनेक मेल एक्सप्रेस या रात्रभर मुंबईत येत असतात.

फेसबुक पेज लाईक करा –