‘एकटा जीव सदाशिव’ 200 कोटींचा मालक, मृत्यूनंतर पोलिसांना करावं लागलं ‘असं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात पोलिसांचा बराच वेळ खर्च झाला. मुंबईतील नेपियर सी रॉड येथील निखिल झवेरी या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील एकही सदस्य यावेळी उपस्थित नव्हता. त्यामुळे पोलिसांनी या व्यक्तीच्या मुलाचा शोध घेत त्याला वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे 200 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक असलेले झवेरी मागील दोन वर्षांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र त्यांचे कोणतेही नातेवाईक आले नाही.

निखिल झवेरी हे मागील काही वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रस्त होते. त्यानंतर त्यांना एका स्वयंसेवी संस्थेने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हापासून त्यांच्यावर 2017 पर्यंत एका रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचबरोबर झवेरी यांच्या संपत्तीविषयी देखील निर्णय घेण्यास एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच त्यांचे दीड लाख रुपयांचे बिल देखील शिल्लक असल्याची रुग्णालयाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. झवेरी यांचे दोन विवाह झाले असून त्यांचा दोन्ही पत्नींशी घटस्फोट झाला आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या संपत्तीवरून मुलगा, पहिली पत्नी आणि बहिणीमध्ये वाद सुरु आहेत.

दरम्यान, झवेरी यांचा मुलगा हा परदेशात राहत असून तो आज आपल्या वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मुंबईत येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like