…म्हणून आता कॅटरीना ‘डान्स’ करणार नाही 

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफने सुप्रसिद्ध कोरिओग्राफर व डायरेक्टर रेमो डिसोझा यांच्या ‘डान्स’ या चित्रपटातून माघार घेतल्याचे समोर आले आहे. ‘भारत’च्या व्यस्त शेड्यूलमुळे कॅटरिनाने ‘डान्स’मधून माघार घेतल्याचे तिच्या प्रवक्त्याने सांगितले असल्याचे समजत आहे. ‘डान्स’ या चित्रपटात  वरूण धवन हा प्रमुख भूमिकेत होता.
Image result for कटरीना ‘डान्स

कॅटरिना ही एक व्यावसायिक अभिनेत्री आहे. शिवाय ‘भारता’च्या व्यस्त शेड्यूलमुळे कॅटरिनाला ‘डान्स’ हा चित्रपट सोडावा लागला असल्याची माहिती प्रवक्त्याने दिली आहे. ‘भारत’ आणि ‘डान्स’ या दोन्ही चित्रपटांच्या तारखा एकदाच येत होत्या. यामुळेच कॅटरीनाने  ‘डान्स’ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि तिने ‘डान्स’ सोडला.
‘भारत’ मधून प्रियांका चोप्रा बाहेर पडल्याने तिच्या जागी कॅटरिनाला संधी मिळाली आहे. कॅटरिनाने सध्या ‘भारत’ या चित्रपटावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. कॅटरिना सध्या ‘भारत’च्या चित्रिकरणात प्रचंड व्यस्त असल्याचे समजत आहे. ‘भारत’ या चित्रपटात सुपरस्टार सलमान खान हा प्रमुख भूमिकेत आहे. ‘डान्स’ हा चित्रपट सोडल्यानंतर तिने ‘डान्स’च्या टीमला शुभेच्छाही दिल्या आहेत.
‘भारत’ विषयी थोडक्यात…
‘भारत’ हा चित्रपट 2019 मध्ये ईदवेळी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अतुल अग्निहोत्री यांच्या रियल लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लि. व भूषण कुमार यांच्या टी सीरिजची निर्मिती आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘भारत’ हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या कोरियन चित्रपट ‘ओड टू माय फादर’ या चित्रपटाचे आधुनिक रूपांतर असल्याचं समजत आहे.