सावरकर वाद : सरकार ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’वर चालते, विचारधारेवर नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – वीर सावरकरांबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपने मोठा वाद निर्माण केला आहे. यावरून राज्यातील भाजपनेही महाविकास आघाडीतील शिवसेनेवर टीका सुरू केली आहे. यास प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. सावरकरांबाबत आम्ही आमची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. यावरून जर कुणी आमच्यावर टीका करत असतील तर त्यांनी हे लक्षात ठेवावे की, सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चालते, विचारधारेवर चालत नाही.

नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, राज्यातील शिवसेना-काँग्रेस-एनसीपीचे महाविकास आघाडीचे सरकार हे कॉमन मिनिमम प्रोग्रामवर काम करत आहे, कोणत्याही विचारधारेवर नाही. तर नागरिकत्व सुधारणा कायद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, या कायद्यावर न्यायालय कोणता निर्णय देते, ते अगोदर पहावे लागेल. त्यानंतर आम्ही आमची भूमिक स्पष्ट करू.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/